Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
थायलंडमधील कंपन्यांना कोल्हापुरात उद्योग क्षेत्रासाठी गुंतवणुकीस स्वारस्यकेशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्यासाठी महापालिकेला घाई ! वीस मिनिटाच्या चर्चेअंती ठराव मंजूर ! !बहुमताच्या जोरावर राजोपाध्येनगरमधील सव्वा एकर जागा खासगी संस्थेला, महापालिकेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने ! पाणीपट्टी दरवाढ लांबणीवर ! !सरकारने दडपशाही करण्यापेक्षा आंदोलकांसोबत चर्चा करावी, शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी४१० दूध संस्थांच्या नोटिसावरुन शौमिका महाडिकांचा तत्कालिक संचालकांसह नेतमंडळीवरही निशाणा डॉ. मेघा पानसरे, डॉ. ऐश्वर्या रेवडकर, कुसुम अलाम, वर्षा ढोके  यांना पुरस्कारशिवसेना ठाकरे पक्षातर्फे  सोनम वांगचुकांच्या लढ्याला पाठिंबा ! सरकारच्या हुकूमशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी ! ! काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी संपत पाटील, अमोल माने भाव सेवेचा - काम राष्ट्रव्यापी ! साथी भरत लाटकरांच्या आठवणींनी डबडबले डोळे... गहिवरली मने !!वकिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक,  बार असोसिएशनतर्फे आमदार राजेश क्षीरसागरांचे आभार

जाहिरात

 

शुक्रवारपासून तीन दिवसीय परिस सेंद्रिय खत महोत्सव

schedule13 May 26 person by visibility 233 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एकटी संस्था व कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, १५ ते १७ मे २०२६ या कालावधीत ‘परीस सेंद्रिय खत महोत्सव’ आयोजित केला आहे. निर्माण चौक, मैल खडडा जरगनगर रोड येथे खत महोत्स्व होत आहे. अशी माहिती एकटी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. महोत्सवात ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती कशी करावी यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. महोत्सवात सेंद्रिय खत विक्रीसाठी आहे. एक किलोच्या कागदी पिशवीत हे खत उपलब्ध आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा महत्वपूर्ण उपक्रम या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. पंधरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता महोत्सवाचे उद्घाटन महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते होणार आहे. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला आक्काताई गोसावी, सारिका भोरे, बनाबाई कांबळे, मंगल कांबळे, सविता कांबळे, शुभम कांबळे, पुष्पा कांबळे, जैनुद्दीन पन्हाळकर, साताप्पा मोहिते ,ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष निवास नलवडे, उमाकांत कांबळे, सदाशिव पुंढे, वसंत पाटील, अशोक देसाई, जयवंत बुटके आदी उपस्थित होते.

 

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes