बार असोसिएशनच्या निवडणुकीत तीस वकील रिंगणात, चिटणीस - मंडलिक पॅनेलमध्ये थेट लढत
schedule23 Apr 26 person by visibility 12 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पंधरा जागेसाठी तीस उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, लोकल ऑडिटर, महिला प्रतिनिधी या सहा पदासह नऊ सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अॅड. प्रशांत चिटणीस विरुद्ध अॅड. राजेंद्र मंडलिक या दोन पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे. ३० एप्रिल २०२६ रोजी मतदान आहे.
अॅड. चिटणीस पॅनेलमधील उमेदवार पुढीलप्रमाणे – अध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. प्रशांत चिटणीस, उपाध्यक्षपदाचे उमेदवार अनिरुद्ध चौगले, सचिवपदाचे उमेदवार विरेंद्रसिंह निंबाळकर, सहसचिवपदाचे उमेदवार सलीम मुल्ला, लोकल ऑडिटरपदासाठी सर्वेश भादिंगरे, महिला प्रतिनिधी उमेदवार स्वाती तानवडे आहेत. सदस्यपदासाठी निलेश पवार, चैत्राली गुरव, वैभव गोरडे, संदीप वाईंगडे, गोविंद शिंदे, साक्षी निकम, राजवर्धन जाधव, अजित कावडे, श्रृतिका पाटील हे उमेदवार आहेत.
अॅड. मंडलिक पॅनेलमधील उमेदवार – अध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. राजेंद्र मंडलिक, उपाध्यक्षपदाचे उमेदवार संजय घाटगे, सचिवपदाचे उमेदवार प्रणिल कालेकर, सहसचिवपदाचे उमेदवार अवधूत पाटील, लोकल ऑडिटरसाठी ऋषिकेश काकडे, महिला प्रतिनिधी उमेदवार शुभांगी निंबाळकर आहेत. सदस्यपदासाठी पूनम पाटील, शरदकुमार चव्हाण, योगेश पवार, जास्मिन लक्ष्मेश्वर, सिद्धार्थ हुक्केरी, श्रावणी पारसनीस, महेश कांबळे, शमिका पोटे, नागेश दरेकर हे उमेदवार आहेत.