कोल्हापुरात एकाचवेळी ५०० भात प्रकारांची निर्मिती, रविवारी होणार विश्वविक्रम
schedule23 Apr 26 person by visibility 15 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विविध प्रातांतील खाद्य संस्कृतीमधील ५०० पेक्षा अधिक भाताच्या अनोख्या पदार्थांंची एकाचवेळी निर्मिती करुन विश्वविक्रमांच्या नोंदीचा प्रयत्न कोल्हापुरात होणार आहे. अश्विनी भोसले हॉस्पिटॅलिटी अँड कलिनरी इन्स्टिट्यूट एलएलपी यांच्यावतीने रविवारी, २५ एप्रिल २०२६ रोजी भात प्रकारांच्या निर्मितीचा हा विक्रम नोंदविण्यात येणार आहे अशी माहित शेफ दिग्विजय भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
हा उपक्रम अश्विनी भोसले हॉस्पिटॅलिटी अँड कलिनरी इन्स्टिट्यूट एलएलपी, वायपी पोवारनगर येथे सकाळी सात वाजता सुरू होणार आहे. परीक्षण आणि त्याच्याशी निगडीत बाबी पूर्ण झाल्यानंतर दुपारी चार वाजल्यापासून तो पाहण्यासाठी साऱ्यांना खुला असेल. हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी दहा व्यावसायिक व अनुभवी शेफ्सची टीम, संस्थेचे विद्यार्थी सहभागी आहेत.या उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीच्या वेगळया पैलूची माहिती पुढे आणण्याचा प्रयत्न असल्याचे भोसले यांनी सांगितले. या उपक्रमातंर्गत बिर्याणी, पुलाव, खिचडी, पेठा, रिसोटो, पायेला, सुशी, जांबालय अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. शेफ्सच्या सर्जनशीलता, कल्पकता आणि नवोपक्रमशीलतेचे दर्शन घडविणे, विद्यार्थ्यांना व्यावसायिक अनुभव प्रदान करणे हा उपक्रम आयोजनामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.