तेरा यात्रास्थळांना क वर्ग मान्यता
schedule06 Jul 24 person by visibility 518 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा यात्रास्थळांना क वर्ग यात्रास्थळ म्हणून मान्यता देण्यात आली. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितच्या बैठकीत हा निर्णय झाला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी सादर केलेल्या जिल्ह्यातील एक लाखावरील भाविक भेट देत असलेल्या यात्रा स्थळांना “क” वर्ग यात्रास्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील हजरत गैबी पीर दर्गा व भेंडवडे गावातील श्री खंडोबा देवालय व गैबी पीर दर्गा, पन्हाळा तालुक्यातील माजगाव पैकी माळवाडी गावातील श्री विठठल रुखमाई मंदिर, पडळ गावातील श्री रामेश्वर मंदिर व पिंपळे तर्फ ठाणे गावातील श्री हनुमान मंदिर, आजरा तालुक्यातील मडीलगे गावातील श्री रामलिंग मंदिर देवालय, राधानगरी तालुक्यातील कौलव गावातील श्री मारुती देवालय, कुडूत्री गावातील श्री कल्लेश्वर मंदिर, तरसंबळे गावातील श्री जोतिर्लिंग मंदिर, भुदरगड तालुक्यातील आकुडे गावातील श्री महादेव मंदिर, करवीर तालुक्यातील जैताळ गावातील श्री हनुमान मंदिर, गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नुल गावातील श्री सुरगीश्वर मंदिराचा समावेश आहे.
क’ वर्ग पर्यटन स्थळ मान्यता - जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनी सादर केलेल्या शाहुवाडी तालुक्यातील पालेश्वर धरण परिसर या पर्यटन स्थळास ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले.