कौस्तुभ गावडे - मयुरी पाटील यांचा विवाह थाटामाटात
schedule04 Feb 26 person by visibility 63 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर या संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे पणतु व संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे नातू चि. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचा विवाह गडहिंग्लज तालुक्यातील कुमरी येथील लहू कृष्णा पाटील यांची सुकन्या मयुरी यांच्याशी मोठया थाटामाटात झाला. महासैनिक दरबार हॉल मंगळवारी, तीन फेब्रुवारी २०२६ रोजी हा विवाह सोहळा झाला.
वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, मालोजीराजे छत्रपती, विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार संजय घाटगे, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव उपस्थित होते. शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, माजी महापौर आर.के.पोवार, महादेवराव आडगुळे, सई खराडे, सागर चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील, नगरसेविका रुपाराणी निकम, नंदकुमार मोरे, राहुल चिकोडे यांनी शुभेच्छा दिल्या.
डीवाय पाटील ग्रुपचे प्रमुख संजय डी.पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे, डी. टी.शिर्के, प्रकुलगुरु ज्योती जाधव, पुणे विभागाचे शिक्षण संचालक शैलेश देवळाणकर, कोल्हापूर विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, प्राचार्य क्रांतीकुमार पाटील, मॅनेजमेंट सदस्या मंजिरी देसाई, कोजिमाशिचे तज्ज्ञ सल्लागार दादासाहेब लाड यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, एस.पी योगेशकुमार गुप्ता यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे, एलआयसीचे माजी अधिकारी मुरलीधर गावडे, संसथेचे कोल्हापूर जिल्हा विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य एस.एम.गवळी, संस्थेचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे आदींनी स्वागत केले.