+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम adjustशिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
1001157259
1001130166
1000995296
schedule08 Jul 24 person by visibility 450 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
"विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम, लंडन येथून आणली जाणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.  सावंत यांनी विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम, लंडन बरोबर केलेल्या पत्रव्यवहारात ही वाघनखे शिवाजी महाराजांची नाहीत हे सामोरे आले.  त्यांनी यासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 
विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम, लंडन येथे असणाऱ्या विविध वाघ नखांपैकी एक वाघनख तीन वर्षांकरीता भाडेतत्वावर आणण्याचा सामंजस्य करार ३ ऑक्टोबर २०२३ रोजी, महाराष्ट्र सरकार व विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम, लंडन यांच्यामधे करण्यात आला आहे. या करारानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा केला आहे. त्या संदर्भातील सरकारी निर्णय देखील सार्वजनिक केले आहेत.
दरम्यान ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत याचे ठोस पुरावे इतिहास संशोधक सावंत यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री, सांस्कृतिक कार्य विभाग सचिव आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्व संचालनालयाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे यांना वारंवार पत्रव्यवहारातून सादर केले आहेत.अशा आशयाचे पत्र इतिहास संशोधक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. पण या गंभीर विषयाबाबत सरकरची उदासिनता दिसून येते, उलट अजूनही खोटी माहिती विविध माध्यमांतून प्रसारित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम, लंडन यांच्याकडून १९ जून २०२४ रोजी पाठवलेल्या पत्रात, ही वाघनखे १९७१ या साली म्यूजियमकडे भेट म्हणून आल्याची माहिती दिली आहे.  विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम, लंडन यांच्या संग्रहात भारतातील विविध ठिकाणांकडून आलेली एकूण ६ वाघनखे आहेत.यामुळे विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम यांच्याकडे असणाऱ्या वाघनखांबाबत म्युझिअम संभ्रमावस्थेत आहे. विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअमकडील वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत, असा कोणताही पुरावा नाही. या संबंधीची सामंजस्य करार करताना उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र  सरकारच्या प्रतिनिधी मंडळाला स्पष्टपणे सांगितले होते. 
महाराष्ट्र सरकार, मंत्री आणि संबंधित अधिकारी अशी महत्वाची माहिती जनतेपासून लपवून ठेवत आहेत आणि ही एक गंभीर बाब आहे. जी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, ती महाराजांचीच आहे असे भासवून लाखो-करोडो शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत आहे. ही वाघनखांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी करोडो रुपयांच्या निधीची उधळपट्टी केली जात आहे. या कामाची जवाबदारी तेजस गर्गे, संचालक - महाराष्ट्र राज्य पुरातत्व व संग्रहलये संचलनालय यांच्या निरीक्षणाखाली सुरू होती, तेजस गर्गे हे लाच घेतल्यामुले मे महिन्यापासून निलंबित आहेत आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी सुरू आहे.
..............................
वाघनखे हे शौर्याचे प्रतिक
छ्त्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे ही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक आहेत. पुरावे ठोसपणे सांगतात की ती सातारच्या छत्रपतींच्याकडे कायम राहिली आहेत. महाराष्ट्राची अस्मिता या वाघनखांशी जोडली गेली आहे, म्हणून लंडन मधील असणाऱ्या वाघनखांच्या प्रतिकृतीला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आहेत असे सांगून छत्रपतींच्या आणि विशेषतः पेशव्यांच्या कैदेतून सुटून सातारा राज्याची पुनर्स्थापना करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या विश्वासार्हतेला तडा पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शंका उत्पन्न झाली आहे.