Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकरचे क्रीडा स्पर्धेत यश जोतिबा यात्रेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे औषधांचे मोफत वाटपसेवक संघाच्या अध्यक्षपदी मिलिंद भोसलेंची फेरनिवड, दोन तास सदस्यांत रंगली चर्चा !जिल्हा परिषद महिला सदस्याचे गंठण चोरटयांनी लांबविले, कसबा बावड्यातील प्रकारकोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ गिरीष फोंडेंवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या ! महापालिकेवर मूक मोर्चा, जोरदार निदर्शने !! शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल साळोखे, उपाध्यक्षपदी विजय इंगवले मुख्याध्यापकांनीच मागितली लाच, पोलिसांनी रंगेहाथ पकडलेदूध उत्पादकांची चांदी, कर्मचाऱ्यांना दोन टक्के जादा बोनसशाखा अभियंता हुपरेंना कारणे दाखवा नोटीस, गायब पाण्याच्या टाक्यांची चौकशी सुरू

जाहिरात

 

जबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी

schedule26 Jul 24 person by visibility 1087 categoryशैक्षणिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापुरातील शैक्षणिक संस्थांना मोठा वारसा. बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची कवाडं खुली व्हावीत, उच्च शिक्षणात त्यांना संधी मिळावी. करिअर घडावं या उदात्त हेतूने या संस्थांची स्थापना झाली. काही संस्था सुवर्णमहोत्सवी साजरा केल्या आहेत तर काही संस्था अमृतमहोत्सवी वर्ष पार केल्या आहेत. बदलत्या काळाची आव्हाने ओळखून शिक्षण संस्था व्यवस्थापनने नवनवीन अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध केले. या शैक्षणिक वाटचालीत शिक्षण संस्थाची धुराही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपविली. वरिष्ठांनी भविष्याचा वेध घेत नव्या पिढीवर शिक्षण संस्थेत विविध पदे सोपविली. सिनीअरच्या मार्गदर्शनाखाली ही नवी पिढी शिक्षण संस्थेतील कामगिरी जबाबदारीने पेलत असल्याचे चित्र पाहावयास आहे. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासनाधिकारी, सचिव, विश्वस्त या पदावर काम करताना नव्या पिढीने आपल्या शिक्षण संस्थेत काळानुरुप अभ्यासक्रम, तंत्रज्ञानाची जो, व्यावसयिक अभ्यासक्रमांची उपलब्धता आणि प्लेसमेंट या चतुसत्रीवर भर देत आहेत.
       ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्का यासाठी शिक्षण प्रसार’ हे ब्रीद डोळयासमोर ठेवून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या विचारांचा कृतीशील वारसा संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे चालवित आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य साळुंखे व संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्था व्यवस्थापन कमिटीच्या सहकार्याने नव्या पिढीतील कौस्तुभ मुरलीधर गावडे हे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहेत. एमकॉम एबीएची पदवी घेतलेल्या कौस्तुभ गावडे हे सीईओ म्हणून नेटाने जबाबदारी पार पाडत आहेत. विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ज्ञानशाखा या महाराष्ट्र आणि कर्नाटकतही. हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, सिनीअर कॉलेज, इंजिनीअर, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट मिळून तब्बल ४०७ शाखा आहेत.
      उच्च शिक्षण क्षेत्रात डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाची वेगळी ओळख आहे. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा विस्तार वाखाणण्याजोगा आहे. कुलपती संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली डीवायपी ग्रुपच्या शैक्षणिक संस्था विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. या संस्थेच्या विश्वस्तपदी पृथ्वीराज संजय पाटील, तेजस सतेज पाटील ही तरुण पिढी सक्रिय आहे. दोघेही सोपविलेल्या जबाबदाऱ्या अतिशय नेटाने पार पाडत आहेत. पृथ्वीराज पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्यही आहेत. शिवाय डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या विविध शाखेशी विश्वस्त म्हणून सक्रिय आहेत. तेजस पाटील यांच्याकडे आकुर्डी आणि साळोखेनगर येथील शिक्षण संकुलाची जबाबदारी आहे.
      कोल्हापूरच्या शैक्षणिक विश्वात ताराराणी विद्यापीठाची वेगळी ओळख. मुलींच्या शिक्षणावर सारा फोकस. बालभवन, हायस्कूल, ज्युनिअर-सिनीअर कॉलेज, डीएड कॉलेज अशा विविध शाखा आहेत. मुलींसाठी होस्टेल आहे. उषाराजे हायस्कूल, कमला कॉलेजची स्वतंत्र ओळख. संस्थेला मोठी परंपरा. सध्या या संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी प्राजक्त क्रांतिकुमार पाटील सांभाळत आहेत. ते स्वत: इंजिनीअर आहेत. बीई मेकॅनिकल आहेत. उद्योजक आहेत. पाच-सहा वर्षापूर्वी त्यांनी सचिवपदी काम करण्यास सुरुवात केली. ताराराणी विद्यापीठाचा दर्जेदार शिक्षणावर भर आहे, महाविद्यलयीन युवतींना पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच व्यावसायिक अभ्यासक्रम शिकता यावेत यासाठी विविध कोर्सेस सुरू केले आहेत. मुली स्वाववलंबी, सक्षम बनाव्यात, उच्च शिक्षित व्हाव्यात हा संस्थेचा दृष्टिकोन आहे.
           शिक्षण प्रसारक मंडळ ही कोल्हापुरातील नामांकित शिक्षण संस्था. शिक्षणमहर्षी एम. आर. देसाई आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्याही विविध शाखा आहेत. कोल्हापुरातील गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमधून शिक्षण घेऊन अनेक पिढया बाहेर पडल्या. कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील अभ्यासक्रम शिकण्याची संधी, पदव्युत्तर असा एमएस्सी जिऑलॉजी अभ्यासक्रम येथे आहे. सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी देसाई-मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी अजित मोरे यांच्याकडे प्रशासनाधिकारीपदाची जबाबदारी सोपविली आहे. पृथ्वी मोरे तरुण आहेत. एमसीएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. नव्या पदावर काम करताना संस्थेतील विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम, व्यावसायिक कोर्सेस, तंत्रज्ञान व प्लेसमेंटवर भर आहे.
           अंबप येथील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्ययक्ष विजयसिंह माने हे तरुण व उमदे नेतृत्व. अशोकराव माने यांनी शिक्षण संस्थेचे रोपटे लावले. या संस्थेच्या अध्यक्षपदी काम करताना विजयसिंह माने यांनी विविध शाखा नव्याने सुरू केले. पूर्वी माध्यमिक शाळा होत्या. आता या संस्थेचे इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए अभ्यासक्रम उपलब्ध केले आहेत. संस्थेचा विस्तार केला. ग्रामीण भागातील मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्याची संधी दिली. शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे फार्मसी कॉलेज सुरू केले. शिक्षणासह सहकार क्षेत्रातही काम करत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes