Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळचे एमडी योगेश गोडबोले यांच्यावर मोठी जबाबदारी, राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधीज्यांच्यासाठी बाग, त्यांच्याच हस्ते उद्घाटन;  लोकार्पणाचा मान चिमुकल्यांनाकाँग्रेस कार्यालय सजले, शहराध्यक्ष प्रविण केसरकर यांचा कार्यालय प्रवेश दिमाखातसुट्टीच्या कालावधीत महालक्ष्मी अन्नछत्रचा दोन लाख भाविकांना लाभजिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतीवर, सीईओंचे गटविकास अधिकाऱ्यांना पत्र मंत्री - कुलगुरू - अधिकाऱ्यांच्या नावाने वृक्ष लागवड ! शिक्षण सहसंचालक कार्यालयाचा उपक्रम!!सतेज पाटलांनी आणलेल्या टोलचे भूत महायुती सरकारने गाडले, ते काय आमची हत्तीवरुन मिरवणूक काढणार ? आमदार राजेश क्षीरसागर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची पदोन्नती सेवा ज्येष्ठतेने व्हावी, शिक्षक संघटना बैठकीत मागणीसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये १७ तासांची ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीशिक्षक संघ थोरात गटाची गुरुवारी राळेगणसिद्धीत महामंडळ सभा

जाहिरात

 

ज्यांच्यासाठी बाग, त्यांच्याच हस्ते उद्घाटन;  लोकार्पणाचा मान चिमुकल्यांना

schedule12 Jun 26 person by visibility 26 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रंकाळा परिसरात लहान मुलांसाठी विकसित करण्यात आलेल्या नव्या बागेचे उद्घाटन एका अनोख्या पद्धतीने करण्यात आले. बाग ज्यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे, त्या चिमुकल्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी, " मुलांसाठी ही बाग तयार करण्यात आली आहे. त्यामुळे तिचे उद्घाटनही मुलांच्याच हस्ते व्हावे, ही आमची भूमिका होती. मुलांना सन्मान आणि सहभाग देणारी ही संकल्पना भविष्यातही जपली जाईल," असे सांगितले.    उद्घाटनानंतर लहान मुलांनी बागेतील विविध खेळांच्या साधनांचा मनमुराद आनंद घेतला. परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत मुलांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेल्या निर्णयाचे कौतुक केले .  याप्रसंगी नगरसेविका संगीता सावंत, नगरसेवक विजय देसाई, संजय सावंत, भगवान माजगावकर, गणेश पाटील, किरण पाटील, सुशांत रावळ, किशोर भोसले, जावेद बागवान, जयदीप पाटील, गुरुप्रसाद जोशी, किसन शिंदे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes