Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतीवर, सीईओंचे गटविकास अधिकाऱ्यांना पत्र मंत्री - कुलगुरू - अधिकाऱ्यांच्या नावाने वृक्ष लागवड ! शिक्षण सहसंचालक कार्यालयाचा उपक्रम!!सतेज पाटलांनी आणलेल्या टोलचे भूत महायुती सरकारने गाडले, ते काय आमची हत्तीवरुन मिरवणूक काढणार ? आमदार राजेश क्षीरसागर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची पदोन्नती सेवा ज्येष्ठतेने व्हावी, शिक्षक संघटना बैठकीत मागणीसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये १७ तासांची ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीशिक्षक संघ थोरात गटाची गुरुवारी राळेगणसिद्धीत महामंडळ सभाजीएसटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यातील अधिकारी महिन्यातून एकदा कोल्हापुरात येणारमुख्यमंत्र्यांचा शक्तिपीठ महामार्गचा सिनेमा कोल्हापूरसह तेरा जिल्ह्यात फ्लॉप होणार - सतेज पाटील सरकारी कंत्राटदारांचे रविवारी कोल्हापुरात महाअधिवेशन ! थकित बिलाचा विषय ऐरणीवर, फेडरेशनची स्थापना होणार !!शक्तिपीठ  महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार !  एकच निर्धार , शक्तिपीठ हद्दपार !!

जाहिरात

 

जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतीवर, सीईओंचे गटविकास अधिकाऱ्यांना पत्र

schedule11 Jun 26 person by visibility 86 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या शाळा इमारत, स्वच्छतागृह व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून  मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन  यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केले आहेत 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 1956 शाळा असून सर्व शाळांमध्ये भौतिक व शैक्षणिक सुविधा जिल्हा परिषद व सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या जातात. जेणेकरुन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची सुविधा सर्व सामान्य वर्गातील मुलांना उपलब्ध व्हाव्यात हा हेतू असतो. उपलब्ध सुविधा नियमित स्वच्छ व वापरणे योग्य राहणेसाठी तसेच शाळांचा परिसर नियमित स्वच्छ ठेवणेसाठी मनुष्यबळ सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीकडील उपलब्ध मनुष्यबळ वापरुन प्रत्येक आठवड्यातील सोमवार व गुरुवार या दिवशी सकाळी नऊ ते दहा या वेळेत  ग्रामपंचायतीकडील कर्मचारी उपलब्ध करुन शाळेची स्वच्छता करुन घ्यावी. याबाबत सर्व सरपंच व ग्रामसेवक यांना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीकडील उपलब्ध मनुष्यबळ वापरुन शाळेची स्वच्छता करणेबाबत आपल्या स्तरावरुन सूचना देणेत याव्यात. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत गटविकास अधिकारी यांनी या कार्यालयास सादर करावा असे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes