सुट्टीच्या कालावधीत महालक्ष्मी अन्नछत्रचा दोन लाख भाविकांना लाभ
schedule12 Jun 26 person by visibility 11 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उन्हाळा सुट्टीच्या निमित्ताने कोल्हापुरातील करवीरनिवासिनीअंबाबाई देवीवच्या दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली. या कालावधीमध्ये महालक्ष्मी अन्नछत्र येथे भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला . जवळपास दोन लाख भाविकांनी मोफत भोजन प्रसादाचा लाभ घेतला. भाविकांच्या सोयीसाठी दोन तास अन्नछत्राची वेळ वाढवण्यात आली होती .मसाले भात आमटी मिक्स भाजी गव्हाची खीर ताक आधी पदार्थ ठेवण्यात आले होते .यासाठी अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ कर्मचारी सेवेत हाते. महालक्ष्मी अन्नछत्रचे संजय जोशी, राजेश सुगंधी, एस के कुलकर्णी, विराज कुलकर्णी, अीड. तन्मय मेवेकरी, सतीश सरनाईक, सुनील खडके, चंद्रशेखर घोरपडे, आदित्य मेवेकरी अतिश जाधव, ऋतुराज सरनोबत, प्रथमेश कुलकर्णी, प्रतीक गुरव, रजत जोशी यांनी संयोजन केले.कपिलतीर्थ मार्केटमधील व्यापारी वर्गानी विषेश सहकार्य केले .
.