Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातशिवराजे स्पोर्ट्सतर्फे गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपशिक्षकांच्या प्रश्नांना विधीमंडळात आवाज देण्यासाठी माझी उमेदवारी- प्रा. सचिन सानपलोकसंवाद-२०२६ उपक्रमांतर्गत आष्टा, कसबे डिग्रजमध्ये प्रबोधनजतमध्ये तहसीलदारांनी साधला गणेशभक्तांशी संवाद, महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षेबाबत  मार्गदर्शनमानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या उद्घाटनाने विसर्जन मिरवणूकीस सुरवातआत्मातर्फे सोमवारी रानभाजी महोत्सव सत्यजीत पाटील गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांच्या समविचारी आघाडी सोबतमहायुतीत कोणी छोटा- मोठा नाही, आम्ही सगळे जुळेभाऊ ! आमच्याकडे ४४०० ठराव, शुक्रवारी प्रचार शुभारंभ ! !महायुतीची गोकुळसाठी महाचर्चा, कोल्हापुरात एकवटले दिग्गज नेते ! जागावाटप संबंधी निर्णय होणार !!

जाहिरात

 

डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात

schedule26 Sep 26 person by visibility 44 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या हिरकणी मंचातर्फे विद्यार्थिनींसाठी आयोजित पारंपरिक ‘गौराई खेळ’ स्पर्धा उत्साहात  झाली.  पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि मधुरा नरके यांच्या हस्ते गणेश-गौरी पूजन व मंगलारतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी १०० हून अधिक विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत झिम्मा, फुगडी, घागर घुमवणे, काठवट-काना, सूप नाचवणे तसेच विविध गौरी गीते सादर करून गौराईचे पारंपरिक खेळ उत्साहात सादर केले.

झिम्मा स्पर्धेत सावित्री ग्रुपने प्रथम, सिव्हिल गर्ल्स ग्रुपने द्वितीय, तर राजमुद्रा ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना करवीर भूमी अभिलेख विभागातील श्रीमती संगीता पाटील, प्राचार्य नरके आणि परीक्षक सुलोचना बागडी यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिरकणी मंचाच्या प्रमुख प्रा. नीलम रणदिवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शीतल साळोखे, तसेच प्रा. ऐश्वर्या पाटील, सिद्धी जाधव, सुहासी साळोखे, नेहा माने, गायत्री आयरे आदींनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes