Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आत्मातर्फे सोमवारी रानभाजी महोत्सव सत्यजीत पाटील गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांच्या समविचारी आघाडी सोबतमहायुतीत कोणी छोटा- मोठा नाही, आम्ही सगळे जुळेभाऊ ! आमच्याकडे ४४०० ठराव, शुक्रवारी प्रचार शुभारंभ ! !महायुतीची गोकुळसाठी महाचर्चा, कोल्हापुरात एकवटले दिग्गज नेते ! जागावाटप संबंधी निर्णय होणार !!अरुण डोंगळेशी खटके, ए वाय पाटलांनी घेतली विनय कोरेंची भेटमहाविकास आघाडीचं ठरलं…शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर ! पदवीधरसाठी डॉ.हर्षदा देशमुख जाधव ?बाजार समितीच्या वार्षिक सभेला सोळा संचालक…५५ सभासद ! सभासदांची नगण्य उपस्थिती चिंताजनक ! ! जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांनी लाटला कोटयवधीचा निधी, काँग्रेसच्या सदस्यांचा पदाधिकाऱ्यांच्यावर हल्लाबोल ! अध्यक्ष- उपाध्यक्ष -सभापती तुपाशी, सदस्य उपाशी!!रोटरी क्लब ऑफ गार्गीजर्फे  यामिनी प्रदर्शनजिप पदाधिकाऱ्यांची कर्मचारी सोसायटीला भेट, कामकाजाचे केले कौतुक !

जाहिरात

 

आत्मातर्फे सोमवारी रानभाजी महोत्सव

schedule25 Sep 26 person by visibility 22 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूरच्या कृषी संस्कृतीला आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना उजाळा देण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्माच्यावतीने सोमवार, 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत व्ही. टी. पाटील सभागृह, राजारामपुरी येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे

जिल्ह्यातील 100 हून अधिक महिला या महोत्सवातील पाककला स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात भाकरी आणि रानभाज्यांपासून बनवलेले खास पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या महोत्सवात  करटोली, अंबुशी, घोळ, आळू , काटेमाट, कुर्डू , पाथरी, टाकळी, बाबू कोंब,  दिंडा इत्यादी  30 प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात येणार आहे. महोत्सवात 25 पेक्षा अधिक प्रजातींच्या रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः महिला, विद्यार्थी आणि खाद्यप्रेमींनी या अनोख्या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रानभाज्यांचे महत्त्व जाणून घ्यावे, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी  केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes