Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कौस्तुभ गावडेंच्या प्रचारासाठी साताऱ्यात शिक्षक सरसावले ! गृहभेटी वैयक्तिक संपर्काद्वारे प्रचारावर भर !!कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात, मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन आमदार म्हणून शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रामाणिकपणाने लढा दिला -: प्रा. जयंत आसगावकरतततइतिहास घडणार, शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे सर्वात तरुण आमदार ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमोठ-मोठे गार झाले गोकुळमध्ये, सतेज पाटलांनी जिंकली निवडणूक ! महायुतीच्या बडया नेत्यांसह वारसदारांनाही झटका !!गोकुळमध्ये शिट्टी वाजली, सतेज पाटील सत्तेच्या दिशेने ! महायुतीला झटका!!तिसऱ्या फेरीअखेर महायुतीचे 14 उमेदवार आघाडीवर, समविचारीचे सहा उमेदवारांची मुसंडीगोकुळमध्ये काटे की टक्कर, 825 मतांची मोजणी पूर्णशिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढायला सदैव पुढे - आमदार जयंत आसगावकर

जाहिरात

 

कौस्तुभ गावडेंच्या प्रचारासाठी साताऱ्यात शिक्षक सरसावले ! गृहभेटी वैयक्तिक संपर्काद्वारे प्रचारावर भर !!

schedule20 Oct 26 person by visibility 11 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना विजयी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रचाराने वेग घेतला आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर मतदारांच्या गृहभेटी घेत, त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आणि कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन करत जिल्ह्यातील शिक्षकांनी ही निवडणूकच आपल्या हातात घेऊन प्रचाराची धुरा अधिक जोमाने चालवली आहे.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा जिल्हा प्रमुख  शशिकांत काटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी विजयादशमीच्या औचित्याने मतदारांशी थेट संपर्क साधला. गृहभेटींच्या माध्यमातून शिक्षक मतदारांशी संवाद साधण्यात आला. प्रत्यक्ष भेट शक्य न झालेल्या मतदारांना दूरध्वनीद्वारे दसऱ्याच्या शुभेच्छा देत मतदानाचे आवाहन करण्यात आले.

प्रचार मोहिमेअंतर्गत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा जिल्हा सहविभाग प्रमुख प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अविनाश नलवडे, डॉ. दीपक जाधव, सातारा टी.डी.एफ.चे अध्यक्ष रवींद्र यादव, मेजर प्रा. मोहन वीरकर आणि प्रा. डॉ. राठोड यांनी यशोदा संकुल येथे दशरथ सगरे यांची भेट घेऊन कौस्तुभ गावडे यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान संकुलातील शिक्षक मतदारांशी संवाद साधण्यात आला. कौस्तुभ गावडे यांच्या कार्याची आणि शिक्षकांच्या प्रश्नांबाबत त्यांच्या भूमिकेची माहिती देत त्यांना निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. शिक्षकांचे प्रश्न समजून घेणारे आणि त्यांच्या हक्कांसाठी सक्षमपणे प्रतिनिधित्व करू शकणारे नेतृत्व विधान परिषदेत पोहोचावे, या भूमिकेतून कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

सातारा जिल्ह्यातील शिक्षकांनी वैयक्तिक संपर्काला प्राधान्य देत प्रचाराचे नियोजन केले आहे. गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि प्रत्यक्ष संवाद अशा विविध माध्यमांतून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर राबविण्यात आलेल्या या मोहिमेतून कार्यकर्त्यांचा उत्साह आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठीची बांधिलकी अधोरेखित झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes