Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार म्हणून शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रामाणिकपणाने लढा दिला -: प्रा. जयंत आसगावकरतततइतिहास घडणार, शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे सर्वात तरुण आमदार ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमोठ-मोठे गार झाले गोकुळमध्ये, सतेज पाटलांनी जिंकली निवडणूक ! महायुतीच्या बडया नेत्यांसह वारसदारांनाही झटका !!गोकुळमध्ये शिट्टी वाजली, सतेज पाटील सत्तेच्या दिशेने ! महायुतीला झटका!!तिसऱ्या फेरीअखेर महायुतीचे 14 उमेदवार आघाडीवर, समविचारीचे सहा उमेदवारांची मुसंडीगोकुळमध्ये काटे की टक्कर, 825 मतांची मोजणी पूर्णशिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढायला सदैव पुढे - आमदार जयंत आसगावकरगोकुळसाठी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान, दहा तालुक्यात शंभर टक्के मतदानअनुवादक हा भाषा -संस्कृतीमधील नाविक, वर्षा गगराणींची साहित्यिक कामगिरी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदविली जाईल : डॉ. दामोदर खडसे

जाहिरात

 

आमदार म्हणून शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रामाणिकपणाने लढा दिला -: प्रा. जयंत आसगावकर

schedule20 Oct 26 person by visibility 23 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘आमदार म्हणून गेल्या सहा सहा वर्षात शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रामाणिकपणे लढा देण्याचे काम केलं. शिक्षक शिक्षण व्यवस्था आणि शाळांच्या समस्या विषयी हा विकास आघाडी म्हणून काल ही कटिबद्ध होतो आणि उद्याही असणार आहे. शिक्षक मतदारांनी पुन्हा एकदा साथ द्यावी.’असे आवाहन पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले.

पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील प्रचार सध्या वेगावला आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीतर्फे शिक्षक संवाद मेळावा झाला. शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभागृहात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ कोल्हापूर येथे शिक्षक मेळावा आयोजित केला होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे कौन्सिल सदस्य दौलत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

 आमदार सतेज पाटील यांनी भाषणात ‘देशाचा शैक्षणिक पाया जुन्या शैक्षणिक संस्थांनी मजबूत केला मात्र विद्यमान सरकार ही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. आमदार आसगावकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. शाळा, शिक्षक व शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या कामांचा ऊहापोह केला. अन्यायकारक संचमान्यता, जुनी पेन्शन योजनेसाठीचा लढा उपस्थितीसमोर मांडला. याप्रसंगी गोखले कॉलेजचे डॉ.भुयेकर, एस. डी. माने, टी.ए. पोवार, शाम पाटील, एस. बी. सूर्यवंशी, विलास अनुसे, शरद बोरवडकर, शिक्षक नेते भरत रसाळे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes