शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढायला सदैव पुढे - आमदार जयंत आसगावकर
schedule19 Oct 26 person by visibility 11 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिक्षकांचे प्रश्न आणि शैक्षणिक समस्या निश्चितपणे प्राधान्याने सोडवल्या जातील, गेली सहा वर्षे आमदार म्हणून काम करत असताना शिक्षक हिताला प्राधान्य दिले. यापुढेही शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढताना कधीही मागे हटणार नाही ’अशी वाही पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिली.
पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल, न्यू हायस्कूल आणि न्यू इंग्लिश मीडियम स्कूलला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडेकर, सचिव प्रभाकर हेरवाडे, सहसचिव एस. एस. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आमदार आसगावकर यांनी गेल्या सहा वर्षात आमदार म्हणून केलेल्या कामाचा ऊहापोह केला. राज्यातील शिक्षकांच्या टप्पा अनुदान वाढीसाठी सातत्याने पाठपुरावा करून शिक्षक बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रामाणिक लढा दिला. पहिल्या टप्प्यापासून ते आतापर्यंत शिक्षकांच्या टप्पा अनुदानाच्या बाबतीत प्रत्येक टप्प्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. विधिमंडळात आवाज उठवला, अभ्यासपूर्ण अहवाल सादर करत तीन टप्प्यांचा प्रश्न मार्गी देखील लावला. शिक्षकांना तीन टप्पे मिळाले देखील. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या कार्यपद्धतीनुसार गेल्या सहा वर्षात काम करण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षकांचा वैयक्तिक प्रश्न असो की संस्थेचा प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.’असे त्यांनी सांगितले.