टीईटी रद्द करण्यासंबंधी शिक्षक संघ थोरात गटातर्फे सुप्रीम कोर्टात याचिका
schedule08 Nov 25 person by visibility 22 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, थोरात गटातर्फे सरसकट टीईटी लागू करण्याच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी शिक्षक संघ थोरात गटाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे, संघाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब झावरे, राज्य कार्याध्यक्ष किशन ईदगे, महानगरपालिका शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष सचिन डिंबळे, चंद्रकांत यादव, रविंद्र घाडगे यांनी दिल्ली गाठली.
सगळयाच शिक्षकांना सरसकटपणे टीईटी लागू करणे हे चुकीचे आहे, हा निर्णय रद्द करावा यासाठी थोरात गटाने स्वतंत्रपणे पुनर्विचार याचिका दाखल केली. यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी, ‘शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक संघाने सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली आहे. टीईटीचा निर्णय हा शिक्षकांवर अन्याय करणार आहे. तेव्हा शिक्षकांच्या सन्मानासाठी सुप्रीम कोर्टात आम्ही लढू. त्यांना न्याय मिळवून देऊ.’अशा शब्दांत यामागील भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान कोल्हापुरात शिक्षक संघ थोरात गटाची कोल्हापुरात नुकतीच महामंडळ सभा झाली झाली होती. या सभेत, टीईटी अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या विरोधात कायदेशीर लढाई व सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा ठराव केला होता.