Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या चेअरमन पदी साताप्पा कासार, व्हाइस चेअरमनपदी अमित परीटमुलींची प्रगती म्हणजे संपूर्ण समाजाचे प्रगती : मंत्री चंद्रकांत पाटीलटीईटी रद्द करण्यासंबंधी शिक्षक संघ थोरात गटातर्फे सुप्रीम कोर्टात याचिकासंजय घोडावत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला माजी राष्ट्रपती प्रमुख पाहुणेशाश्वत विकासाची दिशा स्वीकारली, तर देशासाठी उज्ज्वल भविष्य घडवू - विनायक पईडीवाय पाटील कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पासक्षम उमेदवारलाच उमेदवारी, महाविकास आघाडी म्हणून लढायचं -अजिंक्यतारा कार्यालयात नेत्यांची बैठकगोकुळची गोबरसे समृद्धी बायोगॅस योजना गतिमान, पाच हजार बायोगॅस मंजूर –नविद मुश्रीफराज्यातील यापूर्वीचे सत्ताधारी चमच्याने खायचे, आताचे सत्ताधारी अख्खे भांडेच तोंडाला लावतात-आपच्या मेळाव्यात खरमरीत टीकाजास्तीत जास्त महायुतीचे नगरसेवक निवडून आणू, महापालिकेवर भगवा फडकवू-आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

संजय घोडावत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला माजी राष्ट्रपती प्रमुख पाहुणे

schedule08 Nov 25 person by visibility 27 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  संजय घोडावत विद्यापीठाचा ७ वा दीक्षांत समारंभ बुधवारी (१२ नोव्हेंबर ) विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडणार आहे.या सोहळ्याला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून  तर  प्रख्यात नेत्रतज्ज्ञ व राज्यसभेचे माजी खासदार,पद्मश्री डॉ. विकास महात्मे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

 या दीक्षांत समारंभात विविध शाखांतील एकूण ९३७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये  पदवी व पदव्युत्तर ९२१ तर १६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे . यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, डिझाईन, मीडिया, फिजिकल अँड केमिकल सायन्सेस, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आर्ट्स, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शाखांचा समावेश आहे. या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत,अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. एन. के. पाटील यांनी दिली. विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले आणि कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes