तीस किमीवरुन विद्युत पुरवठा घेणे चुकीचेच, थेट पाइपलाइनसाठी दूधगंगा वीज केंद्रातूनच वीज पुरवठा आवश्यक
schedule30 Jul 24 person by visibility 202
categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काळमवाडी थेट पाईपलाईन योजनेचा वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने कोल्हापूरला पुरेसे पाणी मिळत नाही. हा पुरवठा अखंडित होण्यासाठी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून पुरवठा जोडून घ्या अशी मागणी माजी नगरसेवकासह नागरिकांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे केली.
माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, चंद्रकांत चव्हाण,सविता साळोखे, ओंकार गोसावी, ऋतुराज नढाळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. निवेदनात म्हटले आहे,‘ या योजनेच्या हेडवर्क्स पासून काळम्मावाडी धरणाचे विद्युत निर्मिती केंद्र केवळ दीड किलोमीटर अंतरावर आहे. हे केंद्र नॅशनल पॉवर ग्रीडवर असल्यामुळे तेथे विद्युतपुरवठा अखंडित असतो. तसेच प्रकल्पापासून अंतर कमी असल्यामुळे जरी एखाद्या वेळेस काही घटना घडून पुरवठा बंद झाला तरी तो तातडीने सुरू होवू शकतो. प्रकल्पाच्या सुकाणु समितीच्या दि. 09 मे 2019 रोजीच्या बैठकीत धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातुन विद्युत पुरवठा घेण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. या बैठकीत कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी आणि सल्लागार कंपनीने या प्रस्तावावर सकारात्मकता दाखवली होती. त्यानंतर त्या विभागाचे विद्युत वितरण कंपनीचे शाखा अभियंता यांनी सर्वेक्षण केल्याचे आणि कार्यकारी अभियंता यांनी या जोडणीच्या खर्चाचे अंदाजपत्रक महानगरपालिकेला दिले होते. त्यामुळे प्रशासनाने थेट पाईपलाईन योजनेसाठी काळम्मावाडी धरणाच्या विजनिर्मिती केंद्रातून विद्युतपुरवठा घेण्यासाठी त्वरीत आवश्यक कार्यवाही सुरू करावी अशी आग्रही मागणी
.....................
तीस किलोमीटरवरुन विद्युत पुरवठा घेणे शहाणपणाचे नव्हते
मुळात अतिवृष्टीच्या आणि वादळवारे असलेल्या भागात 30 किलोमीटर लांब विद्युतवाहिनी टाकून विद्युत पुरवठा घेणे शहाणपणाचे नव्हते. या गोष्टीला प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेपासूनच तंज्ञांनी विरोध दर्शवला होता. २०१६ पासून लोकप्रतिनिधींनी सभागृहात, पत्रव्यवहाराव्दारे आणि प्रत्यक्ष भेटून प्रशासनाला या विषयाची अव्यवहार्यता आणि अनुपयोगिता द़ृष्टोत्पत्तीस आणून दिली होती. तरीही राजकीय दबावापुढे झुकून प्रशासनाने या सूचनांकडे दुर्लक्ष केले. परंतु 30 किलोमीटर वरुन विद्युत पुरवठा नेण्याचा निर्णय चुकीचा होता हे आता स्पष्ट झाले आहे. असेही म्हटले आहे.