बाजार समितीतील पदोन्नती प्रकरणातील दोषींवर कारवाई करा; भाजप सहकार आघाडीचे सचिवांना निवेदन
schedule10 Apr 26 person by visibility 30 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सेवा ज्येष्ठता डावलून करण्यात आलेल्या पदोन्नती रद्द झाल्यानंतर, आता या संपूर्ण गैरप्रकाराला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधीर देसाई यांचे नेतृत्वात बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी यांना निवेदन दिले. बाजार समिती प्रशासनाने काही दिवसांपूर्वी सेवा ज्येष्ठतेचे नियम धाब्यावर बसवून काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली होती. या निर्णयाविरोधात बाजार समितीच्या काही संचालकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाला अखेर त्या पदोन्नती रद्द कराव्या लागल्या. मात्र, केवळ पदोन्नती रद्द करून हे प्रकरण थांबवू नये, तर नियमबाह्य पदोन्नतीची प्रक्रिया राबवून संस्थेची दिशाभूल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि दोषींवर प्रशासकीय कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आलीं. यावेळी भाजप सहकार आघाडीचे सरचिटणीस सुधीर बोलवे, उपाध्यक्ष अनिल कोळेकर, प्रशांत दिघे, ईश्वरा पाटील, चिटणीस प्रसाद खोत, व्यापारी प्रतिनिधी अमोल कापसे उपस्थित होते.