Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सिनेट सदस्यांची विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनेमहायुतीचा फॉर्म्युला ठरला ? २९ डिंसेबरपर्यंत उमेदवारांची घोषणा ! निवडणूक कामासाठी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारीसरोज पाटील यांना रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार, २५ डिसेंबरला गडहिंग्लज येथे वितरणराष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीशिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी !अक्षय जहागिरदारला राष्ट्रपती सुवर्णपदक, आर्या देसाईला कुलपती सुवर्णपदक ! !महायुती करणार इलेक्टिव्ह मेरीट उमेदवारांची चाचपणी, उपसमितीची स्थापनाआत्मनिर्भर भारत अंतर्गत फाऊंड्री क्षेत्राला उत्पादनवाढीसह नव्या बाजारपेठांची संधी-प्रदीप पेशकरएसटीच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर विभागाने पटकावले विजेतेपद, जळगावच्या संघाला उपविजेतेपदसतेज पाटील म्हणजे निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करणारे बादशहा : राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल

जाहिरात

 

स्वप्निल कुसाळे ठरला ऑलिम्पिक पदक विजेता ! नेमबाजीत जिंकले कास्यपदक

schedule01 Aug 24 person by visibility 1708 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जगभरातील अव्वल नेमबाजपटूसोबत स्पर्धा, स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वच खेळाडूंचे शर्थीचे प्रयत्न, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा अशा वातावरणात संपूर्ण देशवासियांच्या आशा-आकाक्षा सार्थ ठरवित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळने पॅरिस ऑलिम्पिकपद पदक जिंकले. गुरुवारी दुपारी रंगलेल्या या स्पर्धेत स्प्वनिलने कास्य पदकाचा निशाणा साधताच देशवासियांच्या आनंदाला भरते आले. फटाक्यांची आतषबाजी करत ठिकठिकाणी जल्लोष केला. स्वप्निलच्या माध्यमातून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यावर आणखी एका पदकाची नोंद झाली.५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात स्वप्लिलने ही कामगिरी केली . सोबत कोल्हापूरचे नावही आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा झळकले. सोबत नेमबाजीतील वर्चस्व अधोरेखित झाले. तब्बल 72 वर्षांनी कोल्हापूरच्या खेळाडूंनी ऑलम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवले. 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिपिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.                                    ऑलिम्पिक स्पर्धेतील या खेळ प्रकाराकडे गुरुवारी सकाळपासूनच साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. दुपारी साडेबारा, एक वाजता स्पर्धेला सुरुवात झाली आणि कोल्हापूरवासियांनी टीव्हीसमोर ठाण मांडले. दरम्यान बुधवारी झालेल्या पात्रता फेरीत स्वप्निलने ६०० गुणांपैकी ५९० गुण मिळवत अंतिम फेरीत स्थान पक्क केले होते. कामगिरीत तेच सातत्य कायम ठेवत स्वप्नील यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार, देशाची मान उंचावणार या अपेक्षा मनी बाळगत सारेजण स्वप्नीलच्या खेळाविषयी विश्वास बाळगून होते.
राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील हा खेळाडू. वडील, सुरेश कुसाळे हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक. तर आई  अनिता या कांबळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच. त्याचा जन्म सहा ऑगस्ट १९९५ रोजी झालेला. शालेय जीवनातच नेमबाजीवर लक्ष केंद्रित केले. आणि अल्पावधीतच कौशल्य सिद्ध केले. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविली. या कामगिरीच्या बळावर २०१५ मध्ये रेल्वेमध्ये टीसी म्हणून नियुक्ती झाली. मध्यमवर्गीय कुटुंबांतील या तरुण खेळाडूची कामगिरी प्रत्येक स्पर्धेनिहाय उंचावत गेली.
२०१५ मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत कनिष्ठ गटात ५० मीटर रायफल प्रोनमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. तिरुंवनंतपुरम येथे झालेल्या ६१ व्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. २०२२ मध्ये कैरो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत चौथ्या स्थानासह ऑलिम्पिक बर्थ कोटाही मिळवला. भोपाळ येथे मे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरी पार करत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान निश्चित केले होते.
 पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत मारलेली मुसंडी निश्चितच अभिमानस्पद ठरली. तो अंतिम फेरीत अचूक वेध साधत पदक जिंकणार ही भावना स्वप्निलने सार्थ ठरविली. जगभरातील अन्य सात खेळाडूंशी स्पर्धा करत पदकाला गवसणी घातली. त्याच्या पदक विजयाने कोल्हापुरात विजयोत्सव सुरू आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes