स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूरमध्ये सोळा ऑक्टोबरला ऊस परिषद
schedule14 Oct 25 person by visibility 25 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १६ ॲाक्टोबर 2025 रोजी विक्रमसिंह क्रिडांगणावर २४ वी ऊस परिषद होणार आहे. यावर्षी ऊसाला पहिली उचल किती घ्यायची व आंदोलनाची पुढील दिशा कोणती असणार हे या परिषदेमध्ये ठरणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या पंधरा दिवसापासून विविध भागामध्ये शेतकरी मेळावे , पदाधिकारी बैठका तसेच प्रसार माध्यमातून ऊस परिषदेची तयारी करण्यात आली आहे. विशेषता काटामारी , रिकव्हरी चोरी, तोडणी वाहतूक व उपपदार्थामधून साखर कारखानदार लुबाडणूक करू लागले आहेत. गेल्या पाच वर्षात एफ. आर. पी मध्ये ६५० रूपयाची वाढ झाली आहे मात्र ऊसाचा दर ३ हजार ते ३२०० पर्यंत स्थिर राहिलेला आहे. खते ,बि -बियाणे, किटकनाशके , मजूरी यामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.
राज्य सरकार व साखर संघ एक रक्कमी एफ. आर. पी. मध्ये मोडतोड करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना पहिली उचल २५०० रूपये व मराठवाडा विदर्भातील शेतक-यांना २ हजार ते २२०० रूपये पहिली उचल मिळणार असून यामुळे मोठा फटका ऊस उत्पादक शेतक-यांना बसणार आहे. या सर्व मुद्यांमुळे यंदाची ऊस परिषद जोरदार होणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार , डॅा. बाळासाहेब पाटील , डॅा. महावीर अक्कोळे , आणणासो चौगुले , रामचंद्र फुलारे, सुभाष शेट्टी , सचिन शिंदे , तानाजी वठारे , बंडू चौगुले , शंकर नाळे , बंडू पाटील , विक्रम पाटील , नितेश कोगनोळे , कुमार सुतार , श्रीकांत पाटील उपस्थित होते.