Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्थाशिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटपशिवसेनेचा साठावा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरागायक पंडित विनोद डिग्रजकरांनी अमेरिकत उलगडला बंदिशींचा खजानाटीईटी परीक्षेसाठी राज्यभरात सहा लाखावर परीक्षार्थी, १८ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉचगांधीनगर परिसरातील बांधकामाबाबत भाजप - शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, सुनील मोदींनी तो व्हिडिओ दाखवावाशिवाजी विद्यापीठातर्फे ४१० विद्यार्थ्यांना २९ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती प्रदानशिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. मंजुश्री पवारब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे श्री राम कथाचे आयोजनत्या शिक्षकांना टीईटीतून सवलत मिळावी - भरत रसाळे

जाहिरात

 

प्रवेश पत्रात चूक झालेल्या त्या विद्यार्थ्यांनाही देता येणार बारावीची परीक्षा-पालकमंत्री प्रकाश आबिटकर

schedule09 Feb 25 person by visibility 731 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने आय. टी. , कॉम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स या विषयांची मंडळ मान्यता न घेता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून या विषयांचे फॉर्म भरुन घेतले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर या विषयांचे हॉल तिकीट (प्रवेश पत्र) मिळाले नाही. परंतु या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या होत्या. यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राज्य मंडळाशी संपर्क करुन तातडीने पाठपुरावा केला. 

राज्य मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दंडात्मक शुल्क आकारुन विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांची त्या त्या विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्याबाबत संबंधित कॉलेजला सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित कॉलेजमधील कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याबाबतची दक्षता मंडळामार्फत घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात अभ्यास करावा. विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु कॉलेज मधील बारावीच्या या सर्व मुलांची परीक्षा घेण्यात येईल. पालकांनीही मुलांना विश्वास द्यावा. फॉर्म भरायचे राहिलेल्या विद्यार्थ्यांचे अतिविशेष अतिविलंब शुल्कासह फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कॉलेजमार्फत भरता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे विज्ञान शाखेचे एकूण १४९ विद्यार्थी असून त्यापैकी ७० विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म कॉलेजने ऑनलाईन भरलेले नव्हते. फॉर्म भरलेल्या ७९ विदयार्थ्यांपैकी २६ विद्यार्थ्यांना विषयात दुरुस्ती हवी आहे.   कॉलेजने प्रीलिस्ट दुरुस्तीच्या वेळी विद्यार्थ्यांच्या फॉर्ममधील नाव, विषय, माध्यम यासंबंधीची माहिती तपासून दुरुस्त्या करुन घेणे अपेक्षित होते. तसेच २० जानेवारी २०२५पासून सुधारित ऑनलाइन प्रवेश पत्र उपलब्ध करुन दिलेली माहिती तपासून, आवश्यक त्या दुरुस्त्या करुन घेणे अपेक्षित होते. तशी कार्यवाही कॉलेज कडून झाली नाही. या कनिष्ठ महाविद्यालयाने भरलेल्या फॉर्मनुसार बोर्डाने हॉल तिकीट दिली आहेत. यात  शिक्षण मंडळाकडून कोणतीही चूक झालेली नाही, असे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी कळवले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes