Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगर परिसरातील बांधकामाबाबत भाजप - शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, सुनील मोदींनी तो व्हिडिओ दाखवावाशिवाजी विद्यापीठातर्फे ४१० विद्यार्थ्यांना २९ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती प्रदानशिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. मंजुश्री पवारब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे श्री राम कथाचे आयोजनत्या शिक्षकांना टीईटीतून सवलत मिळावी - भरत रसाळेपाणी टंचाईवरुन नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल, पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव टाकला लांबणीवरशिवाजी विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या १५० विद्यार्थ्यांची कंपन्यात निवडशिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे १९ विद्यार्थी यशस्वीकोल्हापुरात रविवारी राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषदसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक, डॉ शिवशंकर मोरजक्केंचे विशेष कौतुक

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. मंजुश्री पवार

schedule18 Jun 26 person by visibility 76 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते डॉ. पवार यांना गुरुवारी, (१८ जून २०२६ ) नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि केंद्राचे माजी मानद संचालक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या त्या कन्या आहेत.

दिवंगत इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार, कार्य आणि इतिहास यांचा सखोल अभ्यास व संशोधन केले. त्या कार्याचा वारसा रक्तातच असल्याने डॉ. मंजुश्री पवार या पदाला निश्चितपणे न्याय देतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. कामत यांनी या प्रसंगी व्यक्त केला. डॉ. पवार यांचा राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीचे संशोधन, इतिहास आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेन, अशी ग्वाही देताना डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, राजर्षी शाहू संशोधन केंद्राशी डॉ. पवार यांचे भावनिक नाते होते. त्यांनी आयुष्यभर जपलेले संशोधन, इतिहासाची चिकित्सा आणि शाहू विचारांचा प्रसार यांचा वारसा पुढे नेण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी भावनिक, सन्मानाचा आणि तितकाच जबाबदारीचा क्षण आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत केंद्राच्या कार्याला अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. अरुंधती पवार, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes