Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज ददआश्वासन नको – आता ठोस निर्णय हवा, भारतीय मजदूर संघातर्फे आंदोलनउचगावच्या सर्वागिण विकासासाठी  एक कोटी रुपयांचा निधी देणार - खासदार धनंजय महाडिकबेकायदेशीर गर्भलिंग चाचणी - गर्भपात करणाऱ्या एसपी गॅंगच्या 11 जणांवर मोक्का, राज्यातील पहिलीच कारवाईएसएनडीटी विभागीय युवा महोत्सव गाजविला शहीद वीरपत्नीच्या विद्यार्थिनींनी ! सोळा पदकांची कमाई !!शिवाजी विद्यापीठाचा सतीश काळसेकर पुरस्कार प्रभा गणोरकर, रवी कोरडे यांना जाहीरबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकरसंच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा

जाहिरात

 

गायक पंडित विनोद डिग्रजकरांनी अमेरिकत उलगडला बंदिशींचा खजाना

schedule19 Jun 26 person by visibility 268 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : कोल्हापुरातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित विनोद डिग्रजकर यांची अमेरिकेतील न्यू जर्सी येथे नुकतीच शास्त्रीय संगीताची बैठक पार पडली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अमेरिकास्थित महाराष्ट्र व कोल्हापूरच्या गायनप्रेमींची उपस्थिती होती. त्यांची गायन मैफिल न्यू जर्सी येथील जंयत वारुणकर यांनी शब्दबद्ध केली आहे.

वारुणकर लिहितात, ‘गायक कोल्हापूरचे सुपुत्र पंडित विनोद डिग्रजकर अमेरिकेत एक शास्त्रीय संगीताची बैठक पार पडली. न्यू जर्सीत. गायक कोल्हापुरचे. यजमान कोल्हापुरचे. श्रोतेही काही कोल्हापूरचे आणि इतर. बैठक अगदी घरगुती आणि खेळकर वातावरणात झाली. कुठलीही औपचारिकता नाही.  गायक कोल्हापूरचे सुपुत्र पंडित विनोद डिग्रजकर  हे पंडित निवृत्तीबुवा सरनाईक, पंडित जितेंद्र अभिषेकी इत्यादिंची तालीम लाभलेले. गाणं हृदयस्पर्शी. धुंद करून टाकणारं. तडफदार तितकंच हळूवार. तबला आणि पेटीची साथसुद्धा जबरदस्त. काहींना तर आनंदाश्रू आवरेनात. मी तर आनंदाच्या डोहात अविरत डुंबतच होतो. जगाच्या पाठीवर कुठेही असा. कोल्हापूरचा वारसा, कोल्हापूरची कला, आपुलकी, भाषा, प्रेम हे सर्व गुरुत्वाकर्षणापेक्षाही सर्वांना घट्ट खेचून ठेवतात. पंडित विनोद डिग्रजकर यांनी त्यांच्या संग्रही असलेल्या बंदिशींचा खजाना उघडून अमेरिकेत आणि इतर देशात सर्वांना मंत्रमुग्ध करावे.

अनिल मायभाटे यांनी डिग्रजकर यांच्या गायनकलेविषयी म्हटले आहे, ‘ शँटिली मध्ये तुमचं गाणं ऐकून हरखून, भारावून गेलो. तुमचं अत्यंत सुंदर, सुरेल, आणि भावप्रधान गाणं ऐकून कान तृप्त झाले. भारतीय शास्त्रीय संगीताची घराणेदार परंपरा तुमच्या गाण्यात ठायीठायी दिसत तर होतीच. पण तुमची स्वतःची प्रतिभा, आणि शास्त्राच्या पलिकडे जाऊन फक्त सुरांच्या मोहक रांगोळ्या टाकण्यापेक्षा भावपूर्णतेने राग उभा करून एखाद्याचं आतडं पिळवटून टाकण्याचं कसबही अत्यंत प्रभावीपणे आतून भीडत होतं. कधीकधी गाणं दिपवून टाकतं. पण तुमचं संयत गाणं दिपवून टाकण्याची ताकद दाखवून परत एक शांत, गंभीर आणि अंतर्मुख करणारा अनुभव देऊन गेलं. तुमचं गाणं अजूनही ऐकायला फार आवडेल. ’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes