Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
क्रीडाई कोल्हापूरतर्फे तीस जानेवारीपासून चार दिवसीय दालन प्रदर्शन ! वास्तू विषयक १७० स्टॉल्सचा समावेश ! !भाजपकडून शिराळे, खाडे, देसाई, कुंभारांची नावे चर्चेत ! शिवसेनेचाही महापौरपदावर दावा !!कोल्हापूर - इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव !जिल्हा परिषदेची निवडणूक, कार्यकर्त्यांच्या सन्मानाची ! कार्यकर्त्यांना पद, राजकारणात मोठं करणं हा महाडिक पॅटर्न ! !भाजपकडून जिपसाठी ४१, पंचायत समितीसाठी ७२ उमेदवार ! काही तालुक्यात स्वतंत्र, काही ठिकाणी युती! !शु्क्रवारी शाळा सकाळी भरणारगडहिंग्लज-चंदगड -आजरा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, घडयाळ चिन्हावर लढणारकळंब्यात राजकीय घडामोडी ! काँग्रेसचे भोगम भाजपात, विनिता भोगमना जिल्हा परिषदेची उमेदवारी!!डॉ. जे. के. पवार लिखित अमृतमहोत्सवी भारत ग्रंथाचे प्रकाशनजिल्हा परिषदेच्या पाचगाव मतदारसंघात संग्राम पाटील विरुद्ध याज्ञसेनी महेश पाटील

जाहिरात

 

कोल्हापुरात धक्कादायक घटना, मुलाने केला आईचा खून

schedule15 Oct 25 person by visibility 834 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातीर राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क भारतनगर येथे मुलाने आईच्या डोक्यात वरंवटा घालून खून केला. बुधवारी (१५ ऑक्टोबर २०२५) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. दारुला पैसे देत नसल्याच्या रागातून हा खून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पोलिसांनी, विजय अरुण निकम (वय३५ वर्षे) याला या गुन्हयाप्रकरणी अटक केली आहे. राजारामपुरी पोलिसांनी, विजयला घरातूनच अटक केली. सावित्रीबाई आणि मुलगा विजय हे दोघे भारतनगर येथे राहत होते.  विजय हा सेट्रिंगची व डिजीटल फलक लावण्याची काम करतो. त्याला दारुचे व्यसन आहे. त्याची पत्नी आणि दोन मुली विजापूर येथे माहेरी आहेत. विजयने बुधवारी सकाळी दारुच्या नशेत आईकडे पैसे मागितले. पैसे देण्यास आईने नकार दिला. पैसे दिले नाहीत या रागातून त्याने वरंवटा आईच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात सावित्रीबाई या जाग्यावरच ठार झाल्या. विजयने फोन करुन बहिणीला आईचा खून केल्याचे सांगितले. शेजाऱ्यानांही हा प्रकार कळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes