शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी - डॉ. संपत खिलारी
schedule24 Jul 26 person by visibility 15 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना ही गरजू, होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी आहे.’असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले.
वडणगे तालुका करवीर येथील शिवसाई कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या विद्यार्थी दत्तक योजनेतील शालेय साहित्य वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी पाटील, सरोज कास्टींगच्या डायरेक्टर छाया अजित जाधव उपस्थित होत्या. वडणगे येथील शिवसाई मंडळाने २४ वर्षांपूर्वी उत्सवातील गणेश खर्चाला फाटा विद्यार्थी दत्तक योजना सुरू केली . या योजनेतील २५ विद्यार्थ्यांना यंदा मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देण्यात आले. सरोज कास्टिंग्सचे अजित जाधव यांचे यासाठी सहकार्य लाभले.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी, सरोज कास्टिंग डायरेक्टर छाया जाधव, उपक्रमाचे समन्वयक प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी मनोगते व्यक्त केली. मंडळाने गेल्या २४ वर्षात ३२५ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहेत. या उपक्रमातील विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये यशस्वी झाले आहेत.आपण जर एखादे विधायक काम सुरू करून ते चिकाटीने आणि सातत्याने पुढे नेले तर समाजातील दातृत्वाचे अनेक हात मदतीसाठी पुढे येतात, असे नरके यांनी सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक आर. बी. देवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तानाजी पाटील,उपाध्यक्ष आर.एस.पाटील , संचालक राजाराम अस्वले, आण्णासाहेब देवणे , युवराज शेलार, विलास कुंभार,उद्योगपती शिवाजीराव पाटील सरोज कास्टिंगचे एचआर हेड अमेय पार्टे, डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे असिस्टंट रजिस्ट्रार अजित पाटील , रणजीत कल्याणकर , रवी मोरे, शिवसाईचे अध्यक्ष अक्षय पाटील, संभाजी चव्हाण, योगेश माने,विक्रम पाटील ,प्रदीप चौगले उपस्थित होते. के. व्ही. इरुडकर यांनी सूत्रसंचालन केले.