४१० दूध संस्थेविषयी शौमिका महाडिकांचे प्रेम हे पुतना मावशीचे, सभासदांचे पत्रक
schedule24 Jul 26 person by visibility 12 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘प्रशासनाने नोटिसा काढलेल्या ४१० दूध संस्थाविषयी गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक या कोरडी सहानुभूती दाखवित आहेत. त्यासंस्थेविषयी त्यांचे प्रेम हे पुतना मावशीचे आहे असा टोला संबंधित दूध संस्थांनी लगाविला आहे. पत्रकात म्हटले आहे, ‘शौमिका महाडिक व अन्य काही जणांनी ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात जाऊन ४१० दूध संस्थाविषयी कोरडी सहानुभूती दाखविल आहे. त्यांच्या या भूमिकेने आम्ही आश्चर्यचकित झालो. कारण आमचा मतदानाचा अधिकार काढून ब वर्ग सभासद करण्याचा घाट दिसतो. यावरुन त्यांच्या मनात नेमके काय आहे ? याची जाणीव झाली. महाडिक या गोकुळ दूध संघाच्या माजी संचालिका आहेत. त्यांनी संस्था नोंदणीची प्रक्रिया माहित असायला हवी होती. या दूध संस्थांनी रितसर प्रक्रिया पूर्ण करुनही पुन्हा त्यासंबंधी प्रश्न उपस्थित करत आहेत. यावरुन त्यांना, या संस्थांचा मतदानाचा अधिकार घालवायचा आहे. मात्र सभासद ते सहन करणार नाहीत असे पत्रकात म्हटले आहे.