Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजमधून सुसंस्कारी वकील-न्यायाधीश निर्माण होतील –प्राचार्य अभयकुमार साळुंखेआयुक्त अॅक्शन मोडवर, नेत्रदीप सरनोबत, रमेश कांबळेंची खातेनिहाय चौकशी ! तीन अधिकारी निलंबित ! !प्रत्येक तालुक्यातील एका गावात प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र शिक्षक बदली पोर्टलमधील अअनियमितता दूर करा, अन्यथा कोर्टात दाद मागणार : पुरोगामी शिक्षक संघटनापालक सहभागातून वर्गाचा कायापालट, नेहरुनगर विद्यामंदिरातवारणा समूह विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्केमला पैसे खायला आवडतात-माझं पगारात भागत नाही : महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध आपचे आंदोलनन्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहातसिद्धगिरी हॉस्पिटलचा सेवाभाव, एक लाखात एंडोस्कोपिक कि - होल शस्त्रक्रिया शिक्षकांच्या चौथ्या टप्प्यातील बदलीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध

जाहिरात

 

शिवाजी तरुण मंडळने जिंकला शारंग चषक ! संयुक्त जुना बुधवार पेठ उपविजेता !!

schedule08 Jun 25 person by visibility 275 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हजारो फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीमध्ये रंगलेल्या शारंग चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघावर दोन विरुद्ध एक गोलफरकांनी विजय मिळवला. स्पर्धेच्या विजेत्या शिवाजी तरुण मंडळाला एक लाख ५१ हजार रुपये व चषक तर उपविजेत्या संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघाला एक लाख रुपये बक्षीस देण्यात आले.येथील शाहू स्टेडियम येथील हिरवळीवर ही स्पर्धा झाली. नेताजी तरुण मंडळातर्फे या स्पर्धेचे आयोजन केले होते. कै. वसंतराव जयवंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ स्पर्धा भरविली होती.

 खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ झाला. स्पर्धेचे संयोजक स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, माजी महापौर निलोफर आजरेकर, केएसएचे मानद सरचिटणीस माणिक मंडलिक, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, अरुण जाधव, कल्याणराव निकम, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, महेश सावंत, विजय सुर्यवंशी, सूरज देशमुख, नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, राजू राऊत, प्रदीप साळोखे, सिद्धार्थ देशमुख, वैभव माने, अभिजीत खतकर, दीपक घोडके, सॉकर रेफ्री असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेतील मालिकावीरास २५ हजार, उत्कृष्ट खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले. शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू करण चव्हाण बंदरे हा मालिकावीर ठरला. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून रविराज भोसले –फॉरवर्ड, हर्ष जरग – उत्कृष्ट हाफ, विशाल पाटील – उत्कृष्ट डिफेन्स, जिगर राठोड -गोलरक्षक यांना गौरविले.

शिवाजी तरुण मंडळ व बुधवार पेठ फुटबॉल संघात शनिवारी अंतिम सामना झाला. शिवाजी तरुण मंडळाकडून करण चव्हाण, सिद्धेश साळोखे, योगेश कदम, निखिल कदम, देवराज मंडलिक, दर्शन पाटील, इंद्रजीत चौगुले यांनी उत्कृष्ट समनयव राखत सामन्यावर पकड ठेवली. बुधवार पेठ फुटबॉल संघाकडून खेळाडू रविराज चव्हाण, हर्ष जरग, अभिजीत साळोखे, संकेत जरग, पृथ्वीराज निकम, तेजस जाधव यांनी खेळात चमक दाखविली. पूर्वार्धात संयुक् जुना बुधवार पेठेस एक पेनल्टी मिळाली. प्रसाद सरनाईकनने मारलेला फटका शिवाजी तरुण मंडळाचा गोलरक्षक जिगर राठोडने अडविला.

सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला  शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू इंद्रजीत चौगुलेच्या पासवर करण चव्हाणने गोल केला. संघाला एक विरुद्ध शून्य गोलची आघाडी मिळाली. हा गोल फेडण्यासाठी संयुक्त जुना बुधवार पेठेच्या संघाने शर्थीचे प्रयत्न केले. वेगवान खेळ केला. तथापि सामन्याच्या ७२ व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या इंद्रजीत चौगुलेने दिलेल्या पासवर देवराज मंडलिकने गोल करत संघाची २-0 अशी आघाडी वाढविली. सामन्याच्या जादा वेळेत संयुक्त जुना बुधवार पेठचा खेळाडू रोहित मंडलिकने शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंना चकवा देत रविराज भोसलेकडे चेंडू सोपविला. मंडलिकच्या पासवर रविराजने गोल करत आघाडी कमी केली. उर्वरित वेळेत शिवाजी तरुण मंडळाने एका गोलची आघाडी कायम ठेवत सामना २ विरुद्ध एक गोलफरकाने जिंकला. विजय साळोखे यांनी निवेदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes