प्रत्येक तालुक्यातील एका गावात प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र
schedule29 Jul 25 person by visibility 48 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदच्या पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर या विभागाने देखील मुख्यमंत्री प्रशायकीय गतीमान अभियानामध्ये जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील प्लास्टीक कच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी तालुकयातून एका गावाची निवड करून प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र (प्लास्टीक वेस्ट मॅनेजमेंट युनिट) सुरू करण्यात येणार आहे. यासाठी बारा तालुक्यातील नऊ गावांची निवड केली आहे.
१५ ऑगस्ट २०२५ पूर्वी सर्व प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करणेचे उददीष्ट निश्चित केले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुलैपर्यंत जिल्हयातील चार गावांमध्ये प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित पाच गावांमधील प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र ऑगस्टमध्ये कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. जिल्हयातील प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र वाटंगी (ता.आजरा), हसूरचंपू (ता.गडहिंग्लज), सरवडे (ता.राधानगरी), कोडोली (ता.पन्हाळा) येथे कार्यान्वित झाली आहेत.
जिल्हयातील सर्व प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी या अभियानांतर्गत कालबध्द नियोजन करण्यात आलेले आहे. तालुक्यातील सर्व गावातील निर्माण होणारा प्लास्टीक कचरा संकलन करण्यासाठी मार्ग निश्चिती करण्यात आलेली आहे. या मार्गावरून नियमित प्लास्टीक संकलन केले जाते. संकलित केलेला कचरा प्रकल्प कार्यस्थळावर पोहोचल्यानंतर या प्लास्टीकचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया (बेलींग, श्रेडींग) केली जाते. गावस्तरावरून संकलित झालेल्या कच-याची नोंदवही ठेवण्यात आलेली आहे. प्रक्रिया केल्यानंतरचे प्लास्टीक खाजगी व्यावयायिकामार्फत पुर्नप्रक्रियेसाठी दिले जाते. पुर्नप्रक्रियेसाठी देण्यात आलेल्या प्लास्टीकची नोंद ही प्रक्रिया केंद्रावर ठेवली आहेत.