Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बंड शमले, अरुण डोंगळेंचा राजीनामा, नेतेमंडळींची सरशी ! शिवसेना महानगर समन्वयकपदी कमलाकर जगदाळेनाळ कोल्हापूरच्या मातीशी जुळलेली…नाते जडलेले आकाशाशी !अलमट्टीसंदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक, महाविकासच्या खासदार-आमदारांना ठेवले बैठकीपासून लांब !  सतेज पाटलांचा सरकारवर निशाणा !!सामाजिक उपक्रमांनी किशोर घाटगेंचा वाढदिवस साजराभारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ कोल्हापुरात शिवसेनेतर्फे तिरंगा पदयात्रागोकुळतर्फे  स्मार्ट वजन काटे-साहित्याचे वाटपराजकारण्यांना सत्ता-फायद्याच्या विषयात इंटरेस्ट, हद्दवाढीचे देणेघेणे नाही –कृती समितीचा आरोपबिल्डर लॉबीसाठी हद्दवाढीचा उद्योग - विरोधी कृती समितीचा आरोपयंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच ! विद्यार्थ्यांनी ऑफलाइन प्रवेश घेऊ नये !!

जाहिरात

 

शिवप्रेमींचा संताप, कोरटकरच्या विरोधात पोलिस स्टेशन- कोर्टाच्या आवारात घोषणा ! झटापटीचा प्रकार

schedule25 Mar 25 person by visibility 609 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी  नागपूर येथील प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली. दरम्यान कोरटकरला न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना जुना राजवाडा पोलीस स्टेशन परिसरात शिवप्रेमींनी प्रचंड घोषणा दिल्या. तसेच  कोर्टातून बाहेर नेताना शिवप्रेमींकडून त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यावेळी पोलीस व त्या कार्यकर्त्यांच्यामध्ये झटापट झाली. शिवप्रेमींनी जोरदार घोषणा देत कोरटकरचा निषेध केला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी तेलंगणा येथे अटक केली होती. कोरडकर ला घेऊन पोलीस मंगळवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे कोरडकरला आणले. दरम्यान सकाळी जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे शिवप्रेमींनी गर्दी केली होती कोरटकरच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. काही कार्यकर्त्यांनी हातात कोल्हापुरी पायतान घेत कोरटकरचा निषेध केला. कोरटकरचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला. पोलीस स्टेशन समोर गर्दी झाली होती पोलिसांनी गर्दीला चकवा देत कोरटकरला जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या मागीलदाराने बाहेर काढले.
दुपारी कोरटकरला कोर्टात हजर केले. पोलिसांकडून कोरटकरला सात दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली. कोर्टाने सगळ्या बाबी विचारात घेऊन कोरटकर शला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली. दरम्यान कोर्टात सुनावणी सुरू असताना छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील हे हातात कोल्हापुरी पायतान घेऊन कोर्टाच्या आवारात दाखल झाले. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.  दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोरटकरला कोर्टा बाहेर नेत असताना शिवप्रेमींनी कोर्टाच्या आवारातच जोरदार घोषणा दिल्या. जय भवानी जय शिवाजीचा नारा दिला. प्रचंड पोलीस बंदोबस्तमध्ये कोरटकरला न्यायालयातून बाहेर नेले जात असताना दोघा जयदीप शेळके व उदय लाड या दोघांनी कोरटकरच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांचे कडे तोडून त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यावेळी ते कार्यकर्ते व पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली. पोलीस प्रशासनाने प्रचंड बंदोबस्तात कोरटकरला वाहनात बसविले.तर पोलिसांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes