शहीद महाविद्यालयाची विद्यार्थिनी इंग्रेडिएंट हंटिंग स्पर्धेत प्रथम
schedule10 Feb 25 person by visibility 86 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संजय घोडावत युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित सायन्स स्टार 2025 जिल्हास्तरीय स्पर्धेत शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या होम सायन्स विभागातील विद्यार्थिनी ज्योती एकनाथ थोरवत हिने उल्लेखनीय यश मिळवले आहे "इंग्रेडिएंट हंटिंग" या स्पर्धेत तिने आपल्या कौशल्यपूर्ण निरीक्षण आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. मात्र, ज्योती थोरवत हिने आपल्या अचूक निरीक्षणशक्तीच्या जोरावर स्पर्धकांवर मात करत प्रथम क्रमांक मिळवला.या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर आणि शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी तिचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी तिला प्रा. गायत्री पाटील, प्रा. सिद्धार्थ चव्हाण आणि प्रा. पुनम शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.