Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाहूवाडीत काँग्रेसला धक्का, करणसिंह गायकवाड करणार जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेशकोल्हापुरात रविवारी राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलन, 25 इतिहास अभ्यासक - संशोधकांचा सहभाग पीएचडी विद्यार्थ्यांचे अर्धशतक ! डॉ. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडले पन्नास संशोधक !!महापालिका अधिकाऱ्यांची कमाल, टाकावूतून टिकाऊ !  भंगारातील आरसी वाहनांचे ट्रकमध्ये रुपांतर ! !शिवकाळातील इतिहासाला वंदन करत सह्याद्री प्रतिष्ठानची पदभ्रमंती मोहीम, वाड्यावस्त्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपकोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी मंत्रालयात सामंजस्य करार, ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम होणारजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विनय प्रकाशदिप योजना- सभापती शीतल यादव  इंडिया आघाडीतर्फे शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने, निवेदन स्वीकारण्यास प्रशासनाचा नकारथायलंडमधील कंपन्यांना कोल्हापुरात उद्योग क्षेत्रासाठी गुंतवणुकीस स्वारस्यकेशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्यासाठी महापालिकेला घाई ! वीस मिनिटाच्या चर्चेअंती ठराव मंजूर ! !

जाहिरात

 

शाहूवाडीत काँग्रेसला धक्का, करणसिंह गायकवाड करणार जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

schedule22 Jul 26 person by visibility 107 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शाहूवाडी तालुक्यातील काँग्रेसचे नेते व गोकुळचे माजी संचालक करणसिंह गायकवाड हे बुधवारी 22 जुलै 2026 रोजी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करणार आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक  नेते व आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी चार वाजता वारणानगर येथे  पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. गायकवाड हे गेली दहा वर्षे जनसुराज्य  पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांच्यासोबत काम करत आहेत. शाहूवाडी तालुक्यातील स्थानिक राजकारणात  ते आणि कोरे एकत्र आहेत. गायकवाड हे काँग्रेसचे आहेत मात्र स्थानिक राजकारणात त्यांची सोबत कोरे यांना आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक नजीकच्या काळात होत आहे.  या निवडणुकीत प्रत्येक जण आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे यामध्ये ठराव तारकांची संख्या ही जमिनीची बाजू ठरत आहे जास्तीत जास्त ठराव तारक आपल्या बाजूने आहेत हे दाखविण्यासाठी नेते मंडळी प्रयत्नशील आहेत पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील राजकारणात गायकवाड यांना मानणारा एक गट आहे शिवाय गायकवाड हे गोकुळचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. ते , माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांचे पुत्र आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes