Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटीचा पेपर फुटला, रविवारी होणारी परीक्षा रद्द !  शिक्षकांना धक्का !!मनसेची कोल्हापुरात पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवादबीएनआयतर्फे शनिवारी राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग मेळावा, उद्योग संवाद परिसंवादइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारकार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्हा परिषदेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरीराजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटीलशाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन जिपचे बजेट ९६ कोटीवर, सभापती शितल यादव यांनी सादर केले आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पजिपच्या सभेत सदस्यांनी घेतली शिक्षण विभागाची हजेरी, अधिकाऱ्यांच्यावर आरोप ! सीईओंनी नेमली चौकशी समिती ! !रविकिरण इंगवले यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा

जाहिरात

 

टीईटीचा पेपर फुटला, रविवारी होणारी परीक्षा रद्द !  शिक्षकांना धक्का !!

schedule27 Jun 26 person by visibility 300 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी 28 जून 2016 रोजी आयोजित केलेली टीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे भिवंडी येथे टीईटीचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले. या साऱ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षा रद्द केली आहे या संदर्भात अधिकृत माहिती राज्य परीक्षा परिषदच्या आयुक्तांनी दिली आहे.
 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 28 जून रोजी राज्यातील 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे प्रस्तावित होते. नीट परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटीच्या संदर्भात सर्व सुरक्षेच्या उपायोजना केल्या होत्या. दरम्यान 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास भिवंडी येथे काही जणांच्याकडे प्रश्नपत्रिका बद्दलची माहिती असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली. तेव्हा त्या संबंधिताकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 च्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सारा प्रकार लक्षात घेऊन राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे असे म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्णपणे पारदर्शकपणे व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व या सगळ्या प्रकाराबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे म्हटले आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईट प्रसिद्ध करण्यात येईल असेही आयुक्तांनी म्हटले आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes