Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभजिपचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापतीसाठी नवीन वाहन, अंदाजपत्रकात चार कोटीची तरतूदजुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागतजिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस लढविणार, अर्ज दाखलजरगनगर विद्यामंदिर बनली हायटेक शाळा, अत्याधुनिक लॅबची राज्यात महापालिकेची पहिलीच शाळाजिप अध्यक्ष - उपाध्यक्षांची नावे निश्चित ! शिल्पा खोत, तानाजी पाटलांना संधी! जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा

जाहिरात

 

छायाचित्रकारांच्या नजरेतून गावाकडची गोष्ट

schedule30 Jan 26 person by visibility 154 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज  वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील खेडे येथील छायाचित्रकार विलास दादू तोळसणकर यांच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन ३० जानेवारी ते पाच फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शाहू स्मारक भवन येथील कलादालन येथे भरविले आहे. युवराज मालोजीराजे छत्रपती, उद्योजक धनंजय पाटील यांच्या हस्ते  शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. शाश्वत फाऊंडेशनने पुढाकार घेऊन या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात साठहून अधिक छायाचित्रे आहेत. ग्रामजीवनाचे दर्शन घडविणारे हे अनोखे प्रदर्शन साऱ्यांनी पाहावे असे आवाहन संयोजक प्रभाकर पाटील, सागर बकरे, किशोर शहा, मिलिंद पाटील, सचिन करमाळे, सुभाष पाटील यांनी केले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes