कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी संजय शेटे ! उपाध्यक्षपदी राजू पाटील, भरत ओसवाल !!
schedule08 Nov 25 person by visibility 41 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी-उद्योजक-व्यावसायिक यांची शिखर संघटना असलेल्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदी संजय शेटे यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी राजू पाटील यांची फेरनिवड व भरत ओसवाल यांची नव्याने निवड करण्यात आली. मानद सचिवपदी प्रशांत शिंदे, अजित कोठारी, वैभव सावर्डेकर, योगेश कुलकर्णी यांची नव्याने निवड करण्यात आली. खजानिसपदी विज्ञानंद मुंढे यांची नव्याने निवड करण्यात आली.
गेल्या चार दशकांपासून व्यापार-उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत असलेल्या चेंबरने व्यापार-उद्योग वाढीसह सामाजिक उपक्रम देखील राबविले आहेत. आज चेंबरच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी बोलतांना अध्यक्ष संजय शेटे यांनी अध्यक्षपदी फेरनिवड केलेबद्दल सर्व संचालकांचे आभार मानले.येणाऱ्या काळात चेंबर तर्फे राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच सर्व संचालकांना सोबत घेऊन कार्यरत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.माजी आमदार व संचालिका जयश्री जाधव, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीप कापडिया, संचालक दिलीप मोहिते, शिवराज जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. यावेळी शिवाजीराव पोवार, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, राहुल नष्टे, संजय पाटील, प्रकाश केसरकर, संभाजीराव पोवार, प्रकाश पुणेकर, संपत पाटील, लक्ष्मण पटेल आदी उपस्थित होते.