महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, मिरजकर तिकटी मंगळवार पेठ येथील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी संजय पोवार - वाईकर, उपाध्यक्षपदी मोहनराव हजारे, कार्याध्यक्षपदी रामेश्वर पतकी यांची निवड झाली.
ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळेमध्ये संस्थेची वार्षिक सभा झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसनराव कल्याणकर यांनी या निवडी जाहीर केल्या. यावेळी 2024 -25 या वर्षासाठी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सचिवपदी राजेश पार्टे, खजानिसपदी मुसा शेख, ऑडिटरपदी संजय मंगसुळे, तसेच हे प्रमुख म्हणून जयकुमार शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली. कायदा सल्लागार विनायक मोहिते पाटील, कर सल्लागार युवराज तेली, तर कार्यकारणी सदस्य म्हणून सतीश पोवार, किशोर यादव, धनाजी घोरपडे, अविनाश पोवार, प्रशांत बर्गे, अर्जुन शिंदे, नयन यादव, सुनील हंकारे यांचा समावेश आहे. ज्येष्ठ सल्लागार म्हणून संभाजीराव जगदाळे, शिवाजीराव ढवण, नितीन शेळके आहेत. या सभेत संस्थेच्या मागील वर्षाच्या इतिवृत्तांचे वाचन करून कायम करण्यात आले. याडवोकेट गुरुदत्त म्हाडगुत त्यांनी आभार मानले.