Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!रुपाराणी निकम होणार कोल्हापूरच्या महापौर, आज दुपारी अर्ज भरणार ! मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा बांधकाम क्षेत्रातही पुढील तीस वर्षात एआयचे परिणाम जाणवणार – आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोलेसचिनच्या प्रचारार्थ आबाजींचा झंझावात! मतदारांत विश्वास…कार्यकर्त्यांत उत्साह ! !दालन प्रदर्शन पाहण्यास गर्दी उसळली…प्रार्थना बेहरेंनी साधला संवाददि न्यू एज्युकेशन सोसायटीचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरायाज्ञसेनी पाटील यांच्यासह भाजपच्या उमेदवारांना विजयी करुन अशोक पाटील कुटुंबींयांना न्याय द्या : खासदार धनंजय महाडिकमाहिती विभागाचे छायाचित्रकार अनिल यमकरांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सतेज पाटील समर्थक प्रदीप झांबरेंचा भाजपमध्ये प्रवेश ! मुडशिंगीत काँग्रेसला धक्का !!

जाहिरात

 

रुपाराणी निकम होणार कोल्हापूरच्या महापौर, आज दुपारी अर्ज भरणार ! मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

schedule02 Feb 26 person by visibility 298 categoryमहानगरपालिका

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या  नगरसेविका रुपाराणी संग्राम निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन महापूर पदासाठी रूपाने निकम यांचे नाव निश्चित केल्याचे जाहीर केले.  महापालिका निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महायुतीला  स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित झाले. रुपाराणी निकम यांच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर होणार आहेत. 6 फेब्रुवारी रोजी महापौर निवड आहे.
पहिल्या वर्षी भारतीय जनता पक्षाचा महापौर व शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे. शिवसेनेकडून जनसुराज्य शक्ती पक्षातून निवडून आलेले नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. सोमवारी दोन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 26,  शिवसेनेचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे चार नगरसेवक आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे एक नगरसेवक आहे महायुतीचे संख्याबळे 46 वर पोहोचले आहे
 नागाळा पार्क येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक,  आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, भाजपचे गटनेते मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये  भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेत भाजपचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपकडून नगरसेविका निकम  या उमेदवार असतील असे त्यांनी स्पष्ट केले. महापौरपदाची निवड किती वर्षासाठी आहे? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "राजकारणामध्ये स्थिर असे काही नसते. ज्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात." असे सांगत जादा बोलणे टाळले. भाजपकडे महापौर पदासाठी नगरसेवक विजय खाडे, प्रमोद देसाई, विशाल शिराळे, विजय देसाई आणि वैभव कुंभार अशी नावे चर्चात होती महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes