रुद्रांश अॅकॅडमीचे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण
schedule20 Jul 24 person by visibility 563 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजारामपुरी येथील रुद्रांश अॅकॅडमी ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली. रविवारी, २१ जुलै रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे दुपारी चार वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती रुद्रांशचे संचालक दीपक बीडकर यांनी दिली. या पुरस्कार वितरण सोहळयाप्रसंगी रुद्रांशमध्ये कला प्रशिक्षण घेणाऱ्या कलावंतांचाा कलाविष्कारचा कार्यक्रम होणार आहे.
रुद्रांश अॅकेडमीचे यंदाचे पुरस्कार लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर, कुस्ती प्रशिक्षक जयवंत पाटील व अनिता पाटील, झंकार ऑर्केस्ट्रॉचे सुतार बंधू, बालरोगतज्ज्ञ डॉ. किमया शहा आणि पत्रकार नंदिनी नरेवाडी यांना जाहीर झाले आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. पत्रकार परिषदेला कल्याणी फडणीस, अंबिका पाढरबळे, दर्शन शहा, ज्ञानदीप गिजरे, श्रेया चौधरी, रोहित वायकर आदी उपस्थित होते.