Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा नेत्ररोग तज्ज्ञ संघटनेतर्फे शनिवारी विद्यापीठात रॅलीसाहित्यिक शंकर खंडू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापुरात शंकरपट सांस्कृतिक कार्यक्रमडाॅ.दिग्विजय पवार यांचा मलेशियात पुरस्काराने गौरवविजय टिपुगडे यांच्या चित्रांचे तरंगायन प्रदर्शन शनिवारपासूनकोरे अभियांत्रिकीच्या पीबीएल प्रदर्शनात २३००  विद्यार्थ्यांचे ३५० प्रकल्पांचे सादरीकरणचेअरमन झाले, पण फेटा नाही बांधला…! नेत्याच्या आठवणीने राजेश पाटील भावूक ! !खासदार धैर्यशील मानेंनी साजरी केली वाडयावस्तीवरील लोकांसोबत दिवाळीजिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन मुख्याध्यापक शिक्षण- क्रीडा समितीवर सदस्ययशवंत ब्रिगेड-कोळेकर परिवाराची दिपावलीत सामाजिक बांधिलकी आधार प्रमाणीकरण नसलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धारावेत – प्रसाद पाटील

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा नेत्ररोग तज्ज्ञ संघटनेतर्फे शनिवारी विद्यापीठात रॅली

schedule13 Nov 26 person by visibility 7 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: कोल्हापूर जिल्हा नेत्ररोग तज्ज्ञ संघटनेतर्फे मधुमेहदिनानिमित्त शनिवारी, (१४ नोव्हेंबर २०२६) ‘मधुमेह आणि डोळयांची काळजी’यासंबंधी जागृती करण्यासाठी रॅली काढण्यात येणार आहे. शिवाय १४ नोव्हेंबरपासून आरोग्यविषयक विशेषत मधुमेह असणाऱ्या नागरिकांनी डोळयांची काळजी कशी घ्यावी यासंबंधी पंधरा दिवस जागृती करण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षा डॉ. गायत्री हौशिंग, उपाध्यक्ष महेश दळवी व सचिव प्रिती मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली. शनिवारी, सकाळी सात वाजता शिवाजी विद्यापीठ परिसरात रॅली काढण्यात येणार आहे. तसेच सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना डोळयांची काळजी कशी घ्यावी यासंबंधी माहिती दिली जाईल. शिवाय चौदा नोव्हेंबरपासून पंधरा दिवस, नेत्ररोगतज्ज्ञ आपआपल्या दवाखान्यात नागरिकांना डोळयांची निगा यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. मधुमेहामुळे डोळयाच्या पटलावर होणाऱ्या परिणामाला ‘डायबेटिक रिटिनापॅथी’ म्हणतात. हा आजार वेळीच लक्षात न आल्यास कायमस्वरुपी अंधत्व येण्याचा धोका असतो. हा आजार टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, उपचार पद्धती यासंबंधी जागृती करण्यासाठी पंधरवडा आयोजित केला आहे असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. चिंतामणी खरे, डॉ. मंदार जोगळेकर, डॉ. अनंत भोसले, डॉ. पिनाक खारकांडे, डॉ किर्ती ढवळे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes