गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे यांचे निधन
schedule29 Dec 25 person by visibility 20 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र कृष्णाजी तथा आर. के. मोरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने रविवारी, २८ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले. मृत्यूसमयी ते ५८ वर्षाचे होते. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापुराती खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. राधानगरी तालुक्यातील सहकार, राजकारण, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. ज्येष्ठ बंधू विजयसिंह मोरे यांच्या निधनानंतर मोरे गटाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. बिद्री व गोकुळचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी हिताचा कारभार केला. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. अंत्यत्रात्रेला बिद्री कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, कारखान्याचे संचालक राहुल देसाई, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, ए. वाय. पाटील, गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले, उदयसिंह पाटील, सदाशिव चरापले,प्रा. जालंदर पाटील, अजित पोवार, आर. वाय. पाटील, सुरेश सुर्यवंशी, सत्यजित जाधव, विठठलराव खोराटे, सुनील सुर्यवंशी, जीवन पाटील, सुभाष पाटील, डी.एस. पाटील, एस. पी. पाटील, विश्वास पाटील, धीरज डोंगळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.