Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळकडून म्हैस - गाय दूध खरेदी दरात वाढराखीव कर्मचारी निवडणूक भत्ता : लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित शाश्वत विकास म्हणजे सर्वांगीण विकास होय  : डॉ. यशवंत थोरातअहिंसा-सत्य -अस्तेय ही मूल्ये आजच्या समाजाची अपरिहार्य गरज — डॉ. सुषमा रोटेउदंड होणार नगरसेवक, नावापुढे पद -शहरासाठी योगदानाचे काय ? स्वीकृतच्या पदाचीही खांडोळी ! !कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरीडीवाय पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेतेराजर्षी शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचा शनिवारी लोकार्पण सोहळावाढदिवसाला विधायक उपक्रमांची जोड, सुरेंद्र जैन यांचा आदर्शवत पायंडानिसर्गाची हानी न करता केलेला विकास हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास – कुलसचिव व्ही. एन. शिंदे

जाहिरात

 

गोकुळकडून म्हैस - गाय दूध खरेदी दरात वाढ

schedule20 Feb 26 person by visibility 89 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  :  कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम व्हावा यासाठी म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ करण्यात आली. म्हैस दूध खरेदी दरात एक रुपये तर गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे.   21 फेब्रुवारी २०२६  पासून म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर  ५२.५० वरून रूपये ५३.५० रुपये करण्यात आला आहे. गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर दर ३४ रूपये वरून ३६ रूपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे सात ते साडे सात कोटी रुपयाचा जादाचा दर मिळणार आहे. 

 गोकुळ संलग्न ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून जवळ-जवळ १७ लाख लिटर प्रतिदिन संकलन केले जाते. गोकुळचे दूध उत्पादक हेच केंद्रबिंदू असून त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा यासाठी गोकुळ नेहमीच कार्यरत राहिला आहे. दूध उत्पादक, संस्था, सचिव, कर्मचारी प्रत्येक घटक हा गोकुळ परिवाराचा अविभाज्य भाग आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. असे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी  सांगितले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes