Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

डीवाय पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेते

schedule19 Feb 26 person by visibility 329 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :डी वाय पाटील ग्रुपचे  अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रेसिडेंट कप’ क्रिकेट स्पर्धेत पुरुष गटात डी वाय पाटील हॉस्पिटल तर महिला गटात डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघाना सन्मानित करण्यात आले.

डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २०१८ पासून प्रोजेक्ट टीमकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. प्रकाशझोतात खेळविण्यात असलेल्या या स्पर्धेत यंदा पुरुष गटात डी. वाय पाटील ग्रुपच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या एकूण २८ संघांनी तर महिला गटात ८ संघानी सहभाग घेतला होता. 

बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात पुरुष गटात डी. वाय. पाटील हॉस्पिटल संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अजिंक्यतारा संघावर विजय मिळवत विजेतेपद मिळवले.  अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटल संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ षटकात तीन विकेट गमावत ८३ धावा  केल्या. त्यानंतर अजिंक्यतारा संघाला चार बाद ६० या धावसंख्येवर हॉस्पिटल संघाने अजिंक्यपद मिळवले. २ षटकात ८ धावा देऊन ३ गाडी बाद करणाऱ्या अमर त्रिपाठी यांना ‘मॅन ऑफ द मॅच’, तर स्पर्धेत १३२ धावा करणाऱ्या व ५ गडी बाद करणाऱ्या ऋषिकेश पाटील यांना ‘मॅन ऑफ द सिरीज’ ने गौरविण्यात आले.  

 महिला गटात डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी) संघाने विजेतेपद मिळवले. या संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच षटकात एक विकेट गमावत ५३ धावा केल्या. मात्र डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल संघ १ विकेट गमावून केवळ ४५ धावा करू शकला. त्यामुळे त्यांना  उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात २६ धावा व एक बळी मिळवणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या तन्वी पाटील हिला 'प्लेयर ऑफ द मॅच' तर स्पर्धेत ६२ धावा करून ३ विकेट मिळवणारी मेडिकल हॉस्पिटल संघाच्या तृप्ती केसरकर यांना ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ किताब प्रदान करण्यात आला.विजेते, उपविजेते संघ व उत्कृष्ट खेळाडूंना डॉ. संजय डी पाटील व  पृथ्वीराज पाटील यांच्याहस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. 

 यावेळी उपस्थित मान्यवर व सर्व खेळाडूंनी डॉ. संजय डी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डी वाय पाटील आकुर्डीचे कॅम्पस संचालक अमित विक्रम,  डॉ. सदानंद सबनीस, तानाजी जाधव, स्पोर्ट्स डायरेक्टर शंकर गोनुगडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes