प्रा. श्रुती जोशी यांची इचलकरंजीत प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती
schedule21 May 26 person by visibility 261 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा. डॉ. श्रुती जोशी यांची श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. प्रा. जोशी यांनी गुरुवारी 21 मे 2026 रोजी रोजी प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारला. जोशी यांनी विवेकानंद कॉलेजमध्ये अंतर्गत हमी कक्षाच्या समावेश म्हणून कामाची छाप उमटवली आहे. त्या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. इचलकरंजी येथे प्रभारी प्राचार्य पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.