Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शहर काँग्रेसमध्ये फेरबदल, सचिन चव्हाणांना हटविले, प्रवीण केसरकर नवे शहराध्यक्ष !जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील ! !डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्रऔषध विक्रेत्यांचा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाखासगी क्लास संचालकांची सरकारकडे मागणी, नीट पेपरफुटीप्रकरणी दोषीवर कारवाई व्हावीदूरशिक्षण प्रसारासाठी समन्वयकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. कृष्णा पाटीलचालुक्य स्पोर्टस अॅकेडमीतर्फे क्रीडा महोत्सव, प्रवेश निशुल्कश्री आंनदराव आबिटकर इंजिनीअरींग कॉलेजमध्ये सिव्हील - एआय शाखांचा विस्तारगांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र !

जाहिरात

 

डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्र

schedule21 May 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक ) , कोल्हापूर हे तंत्रनिकेतन  डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारमान्य सुविधा केंद्र  म्हणून कार्यरत असून प्रक्रियेसंदर्भातील सर्व सुविधा विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मोफत उपलब्ध करून दिल्या  आहेत.
सुविधा केंद्रामध्ये ऑनलाइन अर्ज भरणेकागदपत्रांचे स्कॅनिंग, कागदपत्रांची पडताळणी, कागदपत्रे अपलोड करणे , अर्ज निश्चिती अशा सर्व सुविधा उपलब्ध असूनडिप्लोमा नंतरच्या व्यवसाय /नोकरीच्या  संधी, कॅप राउंडची संपूर्ण माहिती तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत दिली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी इन्स्टिट्यूटने  विशेष नियोजन केले आहे. " तंत्रशिक्षण संचालनालयाकडून आयोजित डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाी वीस मे ते 22 जून २०२६ या कालावधीत अर्ज निश्चिती करण्याची आहे.

सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच उपलब्ध सर्व शिष्यवृत्ती आणि विविध शासकीय योजना यांची सविस्तर माहिती सुविधा केंद्रामार्फत देत आहोत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रविवारसह सर्व दिवस सुविधा केंद्र सुरू असेल " अशी माहिती संस्थेच्या व्यावसायिक  शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी  यांनी दिली. डिप्लोमा इंजिनिअरिंगमधील विविध अभ्यासक्रमांचे  माहितीदर्शक फलक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदर्शित केले आहेत . तरी सर्व इच्छुक विद्यार्थी पालकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले आहे .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes