+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएनआयटीचे विद्यार्थी तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत अव्वल adjustजरग विद्यामंदिरमध्ये नानासो जरग यांना श्रद्धांजली adjustकोल्हापुरात ट्रक महोत्सव उत्साहात ! चेतन मोटर्स - टाटा मोटर्सचा पुढाकार !! adjustबालिश नेत्याची मुलं विशाळगड आंदोलनात का नव्हती ? सतेज पाटलांचा खासदार महाडिकांना टोला adjustसदभावना रॅलीतून प्रकटला सामाजिक एकोप्यावरील विश्वास adjustशहरातील पाणी पुरवठासंबंधी भाजप नगरसेवकांची अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक adjustमहायुती, महाविकासला पर्याय परिवर्तन आघाडी ! पुण्यात विविध संघटना नेत्यांची बैठक !! adjustव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवर आघाडीचा बहिष्कार ! कुलगुरुंच्यावर मनमानी कारभाराचा आरोप !! adjust४२ हजार वीज कंत्राटी कामगारांना न्याय कधी मिळणार ? राज्यभर आमरण उपोषणाचा इशारा adjustप्रशासकीय कामकाजाला हवा माणुसकीचा चेहरा !
1000621806
1000615695
1000597139
1000567748
1000562876
1000551727
schedule05 Jul 24 person by visibility 492 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील माजी  मराठी विभागप्रमुख 
 प्रा. डॉ .कृष्णा किरवले यांच्या खून प्रकरणात आरोपी प्रीतम गणपती पाटील (वय ४२, रा. म्हाडा कॉलनी, एसएससी बोर्ड मागे) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि वीस हजार रुपये दंड ठोठावला  आरोपीची आई मंगला गणपती पाटीलला तीन वर्ष सक्तमजुरीचे शिक्षा ठोठावली पण खटला चालू असतानाच आरोपी मंगला पाटील यांचे निधन झाले आहे. या खटल्यात सरकारी वकील एस. एस. तांबेकर यांनी काम पाहिले. या खटल्याची माहिती अशी की प्रा.  किरवले यांचा 3 मार्च 2017 रोजी साडेचार वाजता खून झाला. हा खून त्यांच्या बंगला खरेदी व्यवहारातून झाल्याची माहिती तपासात उघड झाली. 2017 मध्ये कृष्णा किरवले आणि प्रीतम पाटील यांच्यात बंगला खरेदीचा व्यवहार झाला. 
तीन मार्च 2017 रोजी खरेदी व्यवहाराचे संचकार पत्र झाले. यावेळी कृष्णा किरवले आणि प्रीतम पाटील यांच्यात आर्थिक कारणांमुळे वाद झाला. या वादातून चिडलेल्या आरोपी प्रीतम पाटील याने कृष्णा किरवले यांच्या बंगल्यात शिरून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यांच्या कपाळ, मान, गळा, डोक्यावर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रीतम पाटील याने आई मंगला गणपती पाटील हिला फोन करून किरवले यांच्या बंगल्यातील खुनात वापरलेला कोयता आणि खरेदी दस्त आणण्यास सांगितले व स्वतःच्या घरात लपवून ठेवण्यास सांगितले. 
तसेच रक्ताची डाग असलेली पॅन्ट दलदलीत फेकून देण्यात आली. तत्कालीन पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी प्रीतम गणपती पाटील आणि मंगला पाटील यांना अटक केली. तत्कालीन शहर पोलीस उपाधीक्षक भारतकुमार राणे आणि डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली या खुनाचा तपास झाला. प्रीतम पाटील आणि मंगला पाटील यांच्या विरोधात कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांच्यासमोर झाली.
 सरकारी वकील एस. एस. तांबेकर यांनी 17 साक्षीदारांची तपासणी घेतली. सर्व साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. पोलिसांनी तपासात केलेला पुरावा, साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकील आणि युक्तीवादात केलेले उच्च न्यायालयाचे निवाडे लक्षात घेऊन कोर्टाने प्रीतम पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि वीस हजार रुपये दंड केला तर मंगला गणपती पाटील यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली. पण खटल्याचे कामकाज सुरू असतानाच मंगला पाटील यांचे निधन झालेले आहे. या खटल्यात कोर्टाचे काम करणारे पोलीस कर्मचारी अशोक शिंदे, सहायक फौजदार नाजनीन देसाई, अॅड रक्षालेखा निकम यांचे सहकार्य लाभले.