शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी प्राचार्य संजय सावंत
schedule13 Nov 26 person by visibility 5 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थान परिषदेच्या सदस्यपदी गडहिंग्लज येथील प्राचार्य डॉ. संजय हरी सावंत यांची निवड झाली. प्राचार्य गटातील खुल्या संवर्गातील ही जागा रिक्त झाली होती. न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचे व्यवस्थापन परिषदेतील सदस्यत्व संपुष्टात आले. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेतील रिक्त् झालेल्या प्राचार्य गटातील जागेवर प्राचार्य सावंत यांची निवड झाली. शिवाजी विद्यापीठाची अधिसभा, सहा नोव्हेंबर २०२६ रोजी झाली. या सभेत, कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांच्या हस्ते व प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्राचार्य सावंत यांना निवडीचे पत्र दिले. श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, महागाव येथे सावंत हे प्राचार्य आहेत.