Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दिवाळीनंतर नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान अन् गुजरातसाठी विमानसेवा - धनंजय महाडिकशाहूवाडीच्या एमआयडीतील गुंतवणुकीसाठी आमदार विनय कोरेंनी घातली कोल्हापुरातील उद्योजकांना सादडीवाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या ! राज्यात तिसऱ्या स्थानी,नवी दिल्लीत सन्मान !!कृष्णराज महाडिक यांच्या युवाशक्ती जागर यात्रेचे सिंधुदुर्गमध्ये जल्लोषी स्वागतन्यू कॉलेजची विद्यार्थिनी श्रेया गुरवला तीस हजाराची शिष्यवृत्तीन्याय- बंधुता - समता या त्रिसूत्रीवर काम करणार - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडशिवसेनेतील निष्ठावंताना विविध नियुक्त्या, पदांच्या माध्यमातून न्याय द्यावाश्री स्वामी समर्थांच्या जीवनावर रॅपसाँग, २४ मे रोजी कोल्हापुरात लॉन्चिंग !आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार अवतारनगरीप्रस्तावित आयटी पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नाव द्या, आमदार क्षीरसागरांची उद्योगमंत्र्यांच्याकडे मागणी

जाहिरात

 

शिवसेनेतील निष्ठावंताना विविध नियुक्त्या, पदांच्या माध्यमातून न्याय द्यावा

schedule25 Apr 26 person by visibility 109 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : शिवसेनेतील निष्ठावंताना विविध नियुक्त्या व पदांच्या माध्यमातून न्याय द्यावा अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

कोल्हापूर जिल्ह्याच्या शिवसेना संपर्कप्रमुख पदावर नियुक्तीनंतर उद्योगमंत्री सामंत हे श्निवरारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. संपर्कप्रमुख नियुक्तीबाबत सामंत यांचा आमदार र क्षीरसागर आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह येथे स्वागत केले. ‘कोल्हापुरात १९८६ पासूनच्या स्थापनेपासूनचे शिवसैनिक निस्वार्थी आणि एकनिष्ठपणे काम करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या उठावानंतर त्यांच्या भूमिकेला समर्थन करण्याची सर्वप्रथम भूमिका फक्त कोल्हापूर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली. आमच्या सर्वांच्या घरावर प्रसंगी मोर्चे आले, जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. अशा या त्रासदायक वेळेतही न डगमगता खंबीरपणे उपमुख्यमंत्री शिंदे यांना साथ दिली. या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना विविध समित्या, महामंडळे, विविध पदांच्या माध्यमातून न्याय देणे आवश्यक असून, यामाध्यमातून निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्यावा, ’अशी मागणीही आमदार क्षीरसागर यांनी मंत्री सामंत यांच्याकडे केली.  

 यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, शहरप्रमुख रणजित जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष दीपक चव्हाण, समन्वयक कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, सुनील जाधव, आश्पाक आजरेकर, रिक्षासेना जिल्हाप्रमुख राजू पवार, अनिल पाटील, टिंकू देशपांडे, कृष्णा लोंढे, अंकुश निपाणीकर, सौरभ कुलकर्णी, देवेंद्र खराडे, सचिन भोळे, किरण अतिग्रे, अर्जुन संकपाळ, मुन्ना तोरस्कर, आदर्श जाधव उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes