Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रग्गेडियन फिटनेस क्लब - कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी कागदावरच्या बोगस दूध संस्था रद्द करा, अन्यथा त्यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतीलभाजपच महिला आरक्षणाच्या विरोधात, लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता मोर्चोचे सोंग - आमदार विश्वजीत कदमकोल्हापूरच्या विकासाचा बनणार ॲक्शन प्लॅन : मंत्री, आमदारांच्या उपस्थितीमध्ये २८ विषयावर चर्चादूध संस्थांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करा, संस्था प्रतिनिधी धडकले सहायक निबंधक कार्यालयावर जिल्हा परिषदेत बिल मंजुरीतील टेबल कमी होणार, बांधकाम विभागाचा निर्णय : सभापती सारिका नांदेकरजिल्हा परिषदेचे पदाधिकारी घेणार तालुकास्तरीय आढावा बैठक, जनता दरबार भरवणार दिवाळीनंतर नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान अन् गुजरातसाठी विमानसेवा - धनंजय महाडिकशाहूवाडीच्या एमआयडीतील गुंतवणुकीसाठी आमदार विनय कोरेंनी घातली कोल्हापुरातील उद्योजकांना सादडीवाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या ! राज्यात तिसऱ्या स्थानी,नवी दिल्लीत सन्मान !!

जाहिरात

 

न्यू कॉलेजची विद्यार्थिनी श्रेया गुरवला तीस हजाराची शिष्यवृत्ती

schedule26 Apr 26 person by visibility 52 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : येथील न्यू कॉलेजमधील मराठी विभागाची विद्यार्थिनी श्रेया अशोक गुरव ( बीए भाग तीन) हिला राज्य सरकारची विशेष प्राविण्य प्राप्त गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर झाली. ओबीसी प्रवर्गातून तीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.साहित्य, संस्कृती,कला, लेखन आणि संशोधन क्षेत्राकडे  गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षित करणे व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.मंजूर शिष्यवृत्तीपैकी पहिल्या टप्प्यात पंधरा हजार १०० रुपयेइतकी रक्कक प्राप्त झाली आहे. या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य व्ही.एम. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनी गुरव हिचा ग्रंथ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, प्राचार्य पाटील, प्रबंधक श्रीमती एम.वाय. कांबळे यांचे विद्यार्थिनी गुरवला प्रोत्साहन लाभले. मराठी विभागप्रमुख डॉ. जी. आर. पाटील, प्रा. डॉ. मनिषा नायकवडी यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes