Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये शह-काटशहाचे राजकारण! आमदारांची तक्रार, दोन दिवसात सहाय्यक निबंधकांची बदली शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून जनगणना प्रशिक्षण आयोजित करा - भरत रसाळेगोकुळमधील वाद चिघळला : प्रकाश बेलवडे यांच्या विरोधात घोषणा, दूध संस्था प्रतिनिधींचा सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चासंयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळतर्फे शिवजयंती महोत्सववेताळमाळ तालीम मंडळ ठरला सतेज चषकाचा मानकरी ! दिलबहार तालीम मंडळाला उपविजेतेपद !!विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रेंचा कार्यालयीन प्रवेश धुमधडाक्यातकोल्हापुरातही शिवसेनेने दुसरे मंत्रीपद द्यावे - सुजित चव्हाण नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची कार्यपद्धती अवलंबणे गरजेचे, निष्ठेला योग्य न्याय मिळतोजिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरीकोल्हापुरात पंधरा एप्रिलपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला

जाहिरात

 

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून जनगणना प्रशिक्षण आयोजित करा - भरत रसाळे

schedule16 Apr 26 person by visibility 15 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :   जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण 26 एप्रिल रोजी होणाऱ्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून देण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ . निरुपमा डांगे  यांच्याकडे केली असल्याची माहिती  माहिती महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली आहे .
भारतीय जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यासाठी  पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून शिक्षकांना   23 एप्रिल ते 8 मे 2026 च्या दरम्यान प्रशिक्षण दिले जाणार आहे .दरम्यानच्या कालावधीमध्ये  इयत्ता चौथी व सातवीसाठीची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी होत आहे. परीक्षेसाठी पर्यवेक्षक केंद्र प्रमुख म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी हजारो शिक्षक  लागणार आहेत .त्यामुळे सदर कालावधीत जनगणना प्रशिक्षण ठेवल्यास या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन  करणे अडचणीचे होणार आहे म्हणून आम्ही आपल्याकडे मागणी करतो की जनगणना  2027 ची कामगिरी एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडण्यास आम्ही सगळे शिक्षक  तयार आहोत . परंतु पहिल्या टप्प्यातील जनगणनेच्या प्रगणक व पर्यवेक्षक यांचा कालावधी निश्चित करताना शासकीय शिष्यवृती परीक्षेच्या वगळून या प्रशिक्षणाचे नियोजन करावे .
असेच निवेदन महाराष्ट्र राज्य  परीक्षा परिषदे कडे केली असून त्यांनीही राज्य म प्रधान जनगणना अधिकारी यांचेकड पत्र पाठवून शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून जनगणना प्रशिक्षणाचे आयोजन करण्याची मागणी करावी अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आहे दिले असल्याची माहिती राज्याध्यक्ष  रसाळे यांनी दिलेले आहे . 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes