Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाळा गुणवत्ता मूल्यांकन- आश्वासन आराखडामध्ये स्वयं मूल्यांकन प्रक्रियेत कोल्हापूर राज्यात तृतीय क्रमांकावरकोल्हापूर शहरातील समस्या दूर करण्याला प्राधान्य द्या- आमदार अमल महाडिकराज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा एक जूनपासून मोफत : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक विद्यार्थीप्रिय शिक्षक ! उत्तम वाचक - वक्ते अन् प्रगतशील शेतकरीही !!बाजार समिती एक सचिव दोन, शासकीय सचिव नियुक्तीविरोधात वळंजूची तक्रारबाजार समिती सभापती नानासो कांबळे यांचा कार्यालयीन प्रवेशसमूह विद्यापीठांनी मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे: कुलपती जिष्णू देव वर्मागोकुळमध्ये शह-काटशहाचे राजकारण! आमदारांची तक्रार, दोन दिवसात सहाय्यक निबंधकांची बदली शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून जनगणना प्रशिक्षण आयोजित करा - भरत रसाळेगोकुळमधील वाद चिघळला : प्रकाश बेलवडे यांच्या विरोधात घोषणा, दूध संस्था प्रतिनिधींचा सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चा

जाहिरात

 

कोल्हापुरात पंधरा एप्रिलपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला

schedule15 Apr 26 person by visibility 61 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर यांची जयंती १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्त शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासन आणि बसव केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १७ एप्रिल २०२६ या कालावधीत  दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे राज सायंकाळी सहा वाजता व्याख्याने होणार आहेत. १५ एप्रिल रोजी विजयपूर येथील प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील यांचे 'वचन साहित्य एक समृद्ध भारतीय ज्ञान परंपरा' या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. दत्ता पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. १६ एप्रिल रोजी निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांचे 'अमृतानुभवातील चिंतन' या विषयावर व्याख्यान आहे.याप्रसंगी प्राचार्य डॉ. जी. पी. माळी अध्यक्षस्थानी असतील. १७ एप्रिल रोजी 'शरण संकुल आणि सत्यशोधक समाज' या विषयावरती धनाजी गुरव मांडणी करणार आहेत यावेळी भारती पाटील अध्यक्षस्थानी असतील. या व्याख्यानमालेचा सर्वांनी लाभघ्यावा असे आवाहन शरणसाहित्य अध्यासनाच्या समन्वयक प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी तसेच बसव केंद्र कोल्हापूरचे विश्वस्त सरला पाटील आणि राजशेखर तंबाके यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes